• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : तुमचं यश या चार लोकांना कधीच सांगू नका, गप्प राहणंच हिताचं, चाणक्य काय म्हणतात?

July 29, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या जगात सगळेच लोकं काही सारखे नसतात. समजात जेवढ्या व्यक्ती असतात, तेवढ्या प्रवृत्ती देखील असतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला यश मिळतं, तेव्हा तुम्ही गप्प राहणंच अधिक फायद्याचं असतं. या जगात असे अनेक लोक असतात, त्यांना तुमचं यश पाहून तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होऊ शकतो. असे लोक तुम्हाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे असे लोक वेळीच ओळखा आणि अशा लोकांबरोबर आपलं यश कधीही शेअर करू नका, असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. पुढे चाणक्य असेलही म्हणतात की या जगात सर्वच लोक हे काही वाईट नसतात,तुमचं चांगलं व्हावं अशी या लोकांची भावना असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मत्सरी लोक – चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्या लोकांना दुसऱ्याची प्रगती कधीही देखवत नाही. एखादा व्यक्ती प्रगती करत असेल तर यांच्या मनात त्याच्याबद्दल मत्सर निर्माण होतो, मग असे लोक यशस्वी व्यक्तीला खाली खेचण्याच्या प्रयत्न करतात, त्यामुळे अशा मत्सरी लोकांपासून नेमही सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यानी दिला आहे.

प्रतिस्पर्धी व्यक्ती – जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल आणि जर मार्केटमध्ये तुमचा प्रतिस्पर्धी असेल तर अशा व्यक्तीसोबत चुकूनही तुमचं यश किंवा व्यवसायातील गुपीत उघड करू नका, असे लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. किंवा तुमच्या मदतीने स्वत:चा स्वार्थ साधू शकतात, यामुळे भविष्यात तुम्ही अडचणी येण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे.

नातेवाईक – चाणक्य म्हणतात असे नातेवाईक ज्यांच्यासोबत तुमचे संबंध बिघडलेले आहेत, किंवा भविष्यात बिघडू शकतात, अशा लोकांसोबत तुम्ही चुकूनही तुमचे पुढचे प्लॅन किंवा तुमचं यश, यशाचं गुपती शेअर करू नका.

विश्वासू नसलेले लोक – चाणक्य म्हणतात जे लोक फार जास्त बोलतात, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही, तेव्हा अशावेळी तुम्ही आपलं यश अशा लोकांसोबत कधीही शेअर करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in