• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : कधी माफ करायचं अन् कधी बदला घ्यायचा? चाणक्य नीती काय सांगते?

July 17, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते.  त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजात वावरताना तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे. जर तुम्ही सावध नसाल तर कोणत्या क्षणी तुमचा घात होऊ शकतो आणि आपला घात केव्हा झाला हे देखील तुमच्या लक्षात येणार नाही. समजात सर्व लोक सारखेच नसतात, काही लोक हे विश्वासघातकी कपटी असतात तर काही लोक हे चांगले देखील असतात. काही लोक हे नेहमी तुमच्या वाईटावर टपलेले असतात. असे लोक आपल्याला वेळेतच ओळखता आले पाहिजे, अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. अनेकदा आपल्या आयुष्यात असे देखील प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात दयेचा भाव निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तीला माफ करायचं की बदला घ्यायचा अशी द्विधा परिस्थिती आपल्या मनाची होते, अशा वेळी काय करावं याबद्दल चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य म्हणतात जर एखादा व्यक्ती तुमचा शत्रू आहे, तो आतापर्यंत कायम तुमचा तिरस्कार करत आला आहे, तुमचा तो कायम द्वेष करतो, परंतु त्याचं मन परिवर्तन झालं, त्याच्या मनात पश्चतापाची भावना निर्माण झाली आणि त्याने तुमची माफी मागितली तर अशा व्यक्तीला एकवेळी तुम्ही माफ करा, परंतु जर एखादा तुमचा मित्र आहे, तो तुमच्याशी सतत गोड बलतो, परंतु त्याने जर तुमचा विश्वासघात केला तर वेळीच सावध व्हा, अशा व्यक्तीने तुमची कितीही माफी मागितली तरी अशा व्यक्तीला तुम्ही कधीही माफ करू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य म्हणतात तुम्ही जर अशा लोकांना माफ केलं तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते, कारण असे लोक पुन्हा तुमची फसवणूक करू शकतात, त्यामुळे अशा लोकांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, अशा लोकांशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in