• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यात कधी गरिबीचं तोंड पहावं लागणा नाही, फक्त या गोष्टींवर नियंत्रण ठेवा

July 13, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने आपल्या जीवनात पैशांचं नियोजन कसं करावं? कुठे पैसा खर्च करावा? आणि कुठे करू नये? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाच्या जीवनात आर्थिक स्थिती ही अतिशय महत्त्वाची असते, असं चाणक्य म्हणतात. माणसाने आपल्या आयुष्यात यश कसं मिळावं याबद्दल सांगताना चाणक्य म्हणतात की माणसाला यश हे असंच मिळत नाही, त्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. अनेकदा तुम्हाला तुमच्या प्रयत्नामध्ये अपयश देखील येऊ शकतं, त्यामुळे कष्ट कधीच मध्ये सोडू नका. जोपर्यंत तुम्हाला यशाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत कष्ट सुरूच ठेवा. पंरतु यश मिळवण्यासाठी फक्त कष्ट करून चालत नाही, तर त्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण देखील ठेवावं लागतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राग -चाणक्य म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागावर नियंत्रण ठेवायला शिका, कारण या जगात राग जेवढं तुमचं नुकसान करतो, तेवढं इतर कोणीही करू शकत नाही. कारण राग आल्यानंतर तुम्ही तुमचं स्वत:वरील नियंत्रण गमावून बसता आणि रागाच्या भरात असा एखादा तडकाफडकी निर्णय घेत की त्यामुळे तुम्हाला नंतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे माणसाने नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे असं चाणक्य म्हणतात

आळस – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादं निश्चित असं ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत, आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही तुमचा आळस झटकून कामाला लागाल. त्यामुळे माणसाचं आळसावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचं आळसावर नियंत्रण आहे, असा व्यक्ती आयुष्यात प्रचंड यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

इच्छा – चाणक्य म्हणतात यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अनेक जण शेजाऱ्याने एखादी नवी वस्तू आणली की दु:खी होतात. त्यांना देखील ती वस्तू हवी असते, त्यामुळे असे लोक गरज नसताना देखील त्या वस्तुची खरेदी करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, पंरतु प्रत्यक्षात माणूस कधीही, सुखी किंवा आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं तुमच्या इच्छावर नियंत्रण असावं , असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in