पुण्यातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा अपघात घडला आहे. मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात अंदाजे पाच ते सहा वाहने एकामागोमाग एक धडकली. यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला. या धडकेमुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही वाहने तर […]
Latest News
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
ठाण्यात जागेसंदर्भात देण्यात आलेल्या टीडीआर (Transferable Development Rights) प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांनी याला मोठा घोटाळा संबोधत यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा टीडीआर देण्यात आला असला तरी, या जागेचा ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात उद्यानाचा भाग म्हणून […]
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर…
E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये घट होत असल्याच्या तक्रारींनंतर केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच वाहनधारकांना E20 सोबत E10 पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकार आणि देशातील ऑईल कंपन्यांमध्ये सध्या गांभीर्यपूर्वक चर्चा सुरू आहे. E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के असते, तर E10 पेट्रोलमध्ये हे प्रमाण 10 […]
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख 12 हजार 786 रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आज ठेवण्यात येणार आहे. एका वर्षाच्या कामासाठी निविदा मागवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रस्तावामुळे महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर रितू तावडे यांचे सोशल मीडिया सध्या कार्यरत […]
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या तरुणाने आता थेट..
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी सीजेपीकडून जंतर -मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं, दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी थेट संसदेवर […]
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
मुंबईत मेडिसिटी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने अमेरिकेच्या जगप्रसिद्ध क्लीव्हलँड क्लिनिकसोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कराराने महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस आणि राजदूत गोर यांच्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक […]