बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर तृणमुल काँग्रेस अंतर्गत मोठा असंतोष खदखदत आहे. हळूहळू या असंतोषाचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम तृणमुल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर टीएमसीच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांमध्ये अंतर्गत कलहांमुळे सामूहिक राजीनामा सत्र सुरु झालं आहे. त्याचवेळी […]
Latest News
पेट्रोल पंपावरील गर्दी कमी करण्यासाठी बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय; फुलारी यांनी दिली मोठी अपडेट
राज्यात डिझेल टंचाईने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. रात्रभर पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगा लागत आहेत. अनेक पेट्रोल पंपावर मारामाऱ्या होत आहेत. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या स्थिती बद्दल माहिती दिली आहे.मागच्या महिन्यात ज्या पद्धतीने इंधन पुरवठा होता, त्याच पद्धतीने तो सुरू आहे, उलट यावर्षी वाढ झाली […]
राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला, मुंबईत असूनही पटेलांची दांडी, तटकरे आणि भुजबळांमध्ये बैठकीतच जुंपली, तर पार्थ पवार…
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची पक्षातील नाराजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी नाराज असल्याचे पुढे आले असतानाच आज राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल पटेल मुंबईत असूनही गैरहजर असल्याने विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे. त्यातच या बैठकीत ज्येष्ठे […]
महायुतीची जम्बो बैठक… अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री हजर, महत्त्वाच्या चर्चेवेळीच बत्ती गुल; सगळीकडे अंधार
महायुती समन्वय समितीची जम्बो बैठक पार पडत आहे. आज पर्यंतच्या झालेल्या बैठकीपेक्षा ही बैठक अधिक महत्त्वाची आणि मोठी आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मेघदूत बंगल्यावर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ या बैठकीसाठी उपस्थित आहे. विधान परिषदेच्या 17 जागांवर यात चर्चा होत आहे. प्रत्येक मंत्र्यांकडून उमेदवारांची नावे सुचवली जात आहेत. ही बैठक सुरू असताना मेघदूत बंगल्याची बत्ती गुल […]
शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का? माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपच्या तिकिटावर अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा प्रोफाइल फोटो ठेवून तसे संकेत दिले आहेत. याआधी तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतली […]
बैठकीत खडाजंगी झाली? आमदार फुटणार? अखेर भुजबळांनी काय सांगितलं?
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र […]