ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी दुर्घटना टळली असून, रस्त्यालगत लावलेला एक मोठा बॅनर अचानक कोसळून दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत दुचाकीवरील प्रवासी थोडक्यात बचावले असून, कोणतीही गंभीर जीवितहानी झालेली नाही. घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, बॅनर कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अचानक बॅनर कोसळल्याने […]
Latest News
पावसाळ्यात या भाज्या खात असाल तर व्हा सावध…, उद्भवू शकतात पोटाच्या गंभीर समस्या
पावसाळ्यात, जिवाणू आणि बुरशीजन्य परिस्थितीमुळे हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात जंतू अन्नातून आपल्या शरीरात सहजपणे प्रवेश करू शकतात. त्यामुळे, पावसाळ्यात पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या भाज्या टाळाव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात, बाजारात विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा उपलब्ध असतात, ज्या दिसायला चांगल्या असल्या तरी, त्या टाळणेच योग्य ठरेल. पावसाच्या पाण्यात जिवाणूंची खूप […]
अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडसोबत राहुल महाजनचा रोमान्स, भडकलेल्या डॉनने ओलांडल्या सर्व मर्यादा; उज्ज्वल निकम यांच्याकडून मोठा खुलासा
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मोनिका बेदी चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा तर सर्वदूर पसरलेल्या होत्या. एवढंच नाही तर, अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा झालेला. अशात अबू सलेम याने मोनिकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर मोनिका हिच्या आयुष्यात मोठं संकट आलं. अबू सलेम याच्या प्रेमात मोनिका हिचं […]
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असून, संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आषाढी वारीदरम्यान जेजुरी परिसरात दिंडीसोबत असलेल्या एका टेम्पोने अचानक नियंत्रण गमावत वारकऱ्यांच्या दिंडीत […]
38 देशांसमोर मोठं आव्हान, तब्बल 48 लाख कोटींचं नुकसान होणार, भारतावरही ओढवणार आतापर्यंतचं सर्वात भयंकर संकट
ईसीडी देशांमधील वृद्ध लोकसंख्या ही पुढील दोन दशकांमध्ये मनुष्यबळापुढील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मार्श यांच्या अहवालानुसार, वयाशी संबंधित भेदभावामुळे 2040 पर्यंत उत्पादकतेत अंदाजे 500 अब्ज डॉलर्स (अंदाजे 48 लाख कोटी रुपये) चे नुकसान होऊ शकते. ओईसीडी म्हणजे ”ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट”. हा प्रामुख्याने 37 उच्च-उत्पन्न […]
शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर बड्या नेत्याचं मोठं विधान
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘ही भेट अचानक झाली मात्र शेवटी पवार साहेबही एकनाथ शिंदे […]