राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्यसभेचे खासदार पार्थ अजित पवार यांच्या लग्नाची तारीख आता समोर आली आहे. कायनात दारा यांच्यासोबत पार्थ पवार यांचा विवाह ठरला असून येत्या 29 जुलै रोजी त्या दोघांचा साखरपुडा होणार आहे. तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही आता समोर आल असून पुढील वर्षी म्हणजे 27 फेब्रुवारी 2027 रोजी ते दोघे विवाहबद्ध होणार आहेत. – राष्ट्रवादी […]
Latest News
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दलाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील […]
पूर्व पतीच्या 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी करिश्मा कपूरचा लढा, निकाल जाहीर, नफ्यात तब्बल इतकी वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर सोना कॉमस्टार चर्चेत आहे. एकीकडे संजय याची दुसरी पत्नी करिश्मा कपूर आणि तिसरी पत्नी प्रिया कपूर सचदेव यांची 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा सुरु आहे. तर दुसरीकडे कंपनीने निकाल जाहीर केले आहेत, ज्याकडे सर्व गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या तीन महिन्यात कंपनीने […]
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ भीषण रस्ता अपघात झाला असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाठार निंबाळकर हद्दीत भरधाव वेगाने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्याच्या कठड्याला जोरदार धडकली. धडकेनंतर कार उलटल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, […]
सॅमसंगचा बॅक टू स्कूल सेल सुरू, या उत्पादनांवर 5 हजार रुपयांची भरघोस सूट
सॅमसंगने भारतात गॅलेक्सी एआय डिव्हाइसेसवर ‘बॅक टू स्कूल’ ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सवलत आणि ‘गॅलेक्सी फॉरएव्हर’चे फायदे दिले जात आहेत. सॅमसंगच्या या सेलदरम्यान, विद्यार्थ्यांना निवडक गॅलेक्सी एआय डिव्हाइसेसवर 10% टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. याव्यतिरिक्त पाच हजार रूपयांपर्यंतच्या बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि ‘गॅलेक्सी फॉरएव्हर’चे फायदे देखील उपलब्ध आहेत. सॅमसंग सेलमध्ये गॅलेक्सी एआय-पॉवर्ड स्मार्टफोन्स, […]
Prakash Ambedkar : आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकर यांची सर्वात मोठी मागणी; ट्विटची चर्चा
नीट (NEET EXAM) परीक्षेतील गैरव्यवहरा. पेपर लीक प्रकरणावरून देशभरात सध्या गदारोल आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले, कित्येक हताश झाले. या सर्वांच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर मोठं आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस त्याचं स्वरूप व्यापक होत चाललं आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी महिनाभर उपोषण केलं, आज त्यांनी ते उपोषण सोडलं असलं तरी सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक […]