टीम इंडियाला गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 51 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताचं 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. न्यू चंदीडगमधील मुल्लानपूर येथील […]
Latest News
IND vs SA : शुबमन गिलला संघात ठेवायचं की नाही? दुसऱ्या टी20 सामन्यातही वाईट स्थिती
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या दोन्ही टी20 सामन्यात भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय टी20 संघात शुबमन गिलची उपकर्णधार म्हणून एन्ट्री झाली. त्यानंतर त्याने ओपनर म्हणून प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली. पण त्याची बॅट काही […]
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पहिल्यांदाच नको ते घडलं, एका षटकात…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात4 गडी गमवून 213 धावा केल्या. यासह विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात जसप्रीत बुमराहसोबत नको ते घडलं. (Photo-PTI) जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. आतापर्यंतचा त्याचा रेकॉर्ड तसाच राहिला आहे. पण […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर; कोर्टात काय घडलं?
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवताना सादर केलेल्या अहवालावर मुंबई हायकोर्टात याचिकाकर्त्यांनी आज आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला असून, राज्य सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत घटनेचे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक […]
मला भेटायला या ना… सुंदर DSP चा बिझनेस मॅनववर लव्ह ट्रॅप, चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ!
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर छत्तीसगडच्या एका डीएसपी आणि एका कोट्यवधी रुपयांच्या बिझनेसमॅनचे व्हॉट्सअॅप चॅट प्रचंड व्हायरल होत आहे. छत्तीसगड पोलिसांच्या डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांची लव्ह स्टोरी, खरंतर ‘लव्ह ट्रॅप’ची जोरदार चर्चा आहे. एका उद्योगपत्याची आणि डीएसपी यांची प्रेमकहाणी आता सस्पेन्स, थ्रिलर आणि फसवणुकीने भरलेली असल्याचे समोर आहे. दोघांचे फोटो, व्हॉट्सअॅप […]
प्ले बटन मिळाल्यावर पैशांचा पाऊस पडतो का? युट्यूबचा नियम काय आहे?
आजकाल यूट्यूब हे फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. यूट्यूबच्या माध्यमातून आजघडीला हजारो कन्टेंट क्रिएटर लाखो, कोट्यवधी रुपये कमवत आहेत. त्यामुळेच आता प्रत्येकजण एन्फ्लुएन्सर होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. जे कन्टेंट क्रिएटर चांगल्या पद्धतीचे कन्टेंट क्रिएट करतात त्यांना यूट्यूबकडून वेगवेगळे प्ले बटन दिले जातात. प्ले बटन देऊन अशा कन्टेंट क्रिएटर्सना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न युट्यूबकडून केला जातो. त्यामुळे […]