दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या UG-NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनातील काही आंदोलकांवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. […]
india
RBI चा आश्चर्यकारक निर्णय, थेट नियमच बदलले, सोने-चांदीप्रमाणे आता बँकांचे व्याजदरही दररोज बदलणार
बँकिंग क्षेत्र आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर, बँका आता जमा केलेल्या रकमेच्या आधारावर, समान मुदतीच्या मोठ्या ठेवींवरही वेगवेगळे व्याजदर निश्चित करू शकतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना लिक्विडिटी कव्हरेज रेशो फ्रेमवर्क अंतर्गत त्यांच्या विशिष्ट रन-ऑफ रेटच्या आधारावर मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची […]
UPI युझर्ससाठी आनंदवार्ता, आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा, तो धोकाच टळला
PhonePe, Google Pay, Paytm सारख्या ॲप्सला राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. आतापर्यंत क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर युझर्सचा नंबर दिसत होता. आजकाल सगळीकडे युपीआयचा वापर वाढला आहे. अनोळखी ठिकाणी सुद्धा युपीआयचा वापर करण्यात येतो. तुमचा मोबाईल क्रमांक थेट मिळत असल्याने त्याच्या गैरवापराच्या तक्रारी वाढल्या होत्या. खासकरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर […]
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर विविध राजकीय नेत्यांकडून अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल दिपके कुटुंबाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उभारलेल्या […]
मार्वेल फॅन्ससाठी मोठी खुशखबर! नव्या कोऱ्या ‘Doctor Doom’ ग्राफिक्ससह TVS Raider 125 लाँच; किंमत अवघी
नव्या टीव्हीएस रेडर 125 मध्ये खास ‘स्पेक्ट्रल ग्रीन’ कलर थीम आणि अत्याधुनिक फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. तरुण खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यात प्रगत ग्राफिक्सचा वापर केला आहे. या बाईकचे इंजिन पूर्वीसारखेच 11.4 bhp पॉवर जनरेट करते, ज्यामुळे यात डिझाईनशिवाय इतर कोणताही तांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. ज्यांना मार्वलचे सुपरहिरो आणि सपर व्हिलन आवडतात त्यांच्यासाठी टीव्हीएस […]
जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या, तर प्राण्यांचीही एकमेकांना वाचवण्याची धडपड; भिवंडीत मध्यरात्री काय घडलं?
भिवंडीमध्ये काल रात्री कोहिनूर नावाची चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. रात्रीपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अजूनही ढिगारे उपसून माणसांना काढण्याचं काम सुरू आहे. ही दुर्घटना अत्यंत भयानक होती, असं पीडितांनी सांगितलं. इमारत कोसळायला सुरुवात झाली तेव्हा काहींनी इमारतीवरून उड्या मारून जीव वाचवण्याचा […]