बेल्जियममधील ईस्ट फ्लँडर्स येथील एका जुन्या घराचे नूतनीकरण सुरू होते. कामगारांना नवीन सांडपाण्याच्या पाईप्स टाकण्याचे काम देण्यात आले होते. घराच्या पायामध्ये खोदकाम सुरू होते आणि सर्व काही नेहमीप्रमाणे चालू होते. अचानक, भिंतीच्या आतून एक पिवळा पदार्थ बाहेर येऊ लागला. सुरुवातीला कामगार गोंधळले, पण खोदकाम करताना त्यांना सोन्याच्या विटा आणि नाणी सापडली. 18 वर्षीय कोबेला सुरुवातीला […]
india
Video : पाकिस्तानच्या युट्यूबरने भारताचा तिरंगा जाळायला सांगितलं, लायटर दिलं आणि भलतंच घडलं; व्हिडीओ एकदा पाहाच!
भारत आणि पाकिस्तानी या दोन शेजारी राष्ट्रांचा स्वातंत्र्य दिन कालपरवा साजरे झाले. दोन्ही देशांच्या फाळणीच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत. पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दोन्ही शेजारील देशात नुकतेच पहलगाम हल्ल्यावरुन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्य चकमक नुकतीच झाली आहे. या दोन्ही […]
उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील तडकाफडकी अंतरवालीला पोहोचले, आज पुन्हा मोठी घोषणा करणार? बैठक बोलावली, नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकाची बैठक बोलावली आहे, ही बैठक झाल्यानंतर […]
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्… पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
नवी मुंबईत अलीकडेच मोठी घटना घडली आहे. नवी मुंबईमधील एका पीडित व्यक्तीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. या नंबवर कॉल केल्याने पोलिसांनीच मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला मारहाण झाली होती आणि मदतीसाठी त्याने 112 या हेल्पलाइन नंबरवर […]
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या पिस्तुलातून विमानतळावर गोळीबार; सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात, मोठी खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान पिस्तुलातून अपघाती गोळी सुटल्याची घटना घडली आहे, यामध्ये विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून हा गोळीबार झाला आहे. रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास बाबतपूर (वाराणसी) विमानतळाच्या टर्मिनल […]
सुट्टी संपण्यापूर्वी पुण्याजवळील या धबधब्यांना भेट द्या, सौंदर्य पाहूनच प्रेमात पडला, फोटोग्राफीसाठी एकदम बेस्ट
पावसाळा सुरू झाला की निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची आणि धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याची अनेकांची इच्छा असते. पुण्याच्या आसपासही पावसाळ्यात हिरवाईने नटलेली आणि धबधब्यांमुळे अधिकच सुंदर दिसणारी अनेक ठिकाणं आहेत. ताम्हिणी घाट हे पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील लोकप्रिय ठिकाण आहे. घाटातून प्रवास करताना आजूबाजूला दिसणारी दाट हिरवाई, डोंगर आणि ठिकठिकाणी कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. भिवपुरी धबधबा […]