• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपके यांच्याकडून मोठे संकेत, आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण..

August 5, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीची आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक आहे. या बैठकीसाठी CJP चे महत्वाचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. अभिजीत दिपके यांच्या घरीच ही बैठक आहे. पक्षाचे पुढचे ध्येय धोरणे आणि संघटना कशी वाढवायची याकरिता ही बैठक आहे. साैरभ रांका यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी अभिजीत दिपकेंच्या घरी दाखल झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. कॉकरोच जनता पार्टीचा हा मोठा विजय होता. आता कॉकरोच जनता पार्टी नक्की काय निर्णय घेते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 12 वर्षात पहिल्याच राजीनामा कॉकरोच जनता पार्टी यांच्या आंदोलनानंतर भाजपामधील झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन अभिजीत दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

आता नुकताच अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीवर मोठे भाष्य केले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आमचा पुढचा रोड मॅप, देशभरात संघटन कसं वाढवला जाईल या बैठकीत आम्ही चर्चा करणार आहोत. झारखंडच्या आंदोलना संदर्भात आम्ही बोललो आहे, त्यांना पूर्ण समर्थन दिल आहे. झारखंडच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत.

पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही. पण, मीडियावाल्यांना त्याची उत्सुकता आहे. आज राजकीय पक्षाची परिस्थिती खूप वाईट आहे. सकाळी आमदार खासदार एका पक्षात असतो, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतो. मीडिया, न्यायपालिका, बेरोजगारी, E20 यावर आम्ही या बैठकीत चर्चा करणार आहोत.

सोनम वागचूक यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे ते या बैठकीला नाहीत. उद्या दुपारी दोन वाजता आणि माध्यमांची संवाद साधू, असेही अभिजीत दिपके यांनी म्हटले. अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता कॉकरोच जनता पार्टीचे भविष्य आंदोलनानंतर नक्की काय असणार असा सवाल वारंवार केला जात आहे. त्यात मोठा निर्णय कॉकरोच जनता पार्टीने घेतला. ते लवकरच मोठी घोषणा करू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
  • एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in