भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून आजही मधुबालाचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या मोहक सौंदर्याचीही चर्चा नेहमी होत होती. अनेक दशकांनंतरही त्यांच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये कायम आहे. विशेष म्हणजे, त्या काळात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सजणे हा प्रतिष्ठेचा भाग मानला जात असतानाही मधुबालांनी नैसर्गिक आणि घरगुती उपायांवरच विश्वास ठेवला. मधुबालांचा […]
entertainment
‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट; नव्या प्रोमोला काही तासांतच 1 मिलियन व्ह्यूज, उत्सुकता शिगेला
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांनी आपल्या घरातील मुला-मुलीसारखा जपला आहे. त्यांच्या प्रत्येक आनंदात प्रेक्षक सहभागी झाले आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत भावनिकरित्या उभे राहिले. आता या लोकप्रिय मालिकेत सर्वात मोठं आणि […]
जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे अमर झालं 8 वर्षे जुनं गाणं; लाखो जेन-झी बनवतायत रील्स
36 दिवसांनंतर दिल्लीतील जंतर-मंतर इथलं विद्यार्थ्यांचं आंदोलन संपुष्टात आलं आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली तरुणवर्ग हे आंदोलन करत होतं. बघता बघता हे आंदोलन देशव्यापी बनलं आणि अखेर प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व घडामोडींदरम्यान आठ वर्षे जुनं एक गाणं तुफान चर्चेत आलं आहे. या गाण्यावरून […]
चित्रपटांना करणार होती रामराम; दिग्दर्शक पतीने अभिनेत्रीसोबत बनवला ब्लॉकबस्टर सिनेमा, ओटीटीवर येताच तुफान ट्रेंड
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नुकताच एक चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम झाला आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. ओटीटीवर येताच या चित्रपटाने आपली कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण चित्रपटाची धुरा फक्त आणि फक्त एका अभिनेत्रीने सांभाळली आहे. या चित्रपटात कॉमेडी आणि अॅक्शनचा […]
‘दिग्दर्शकासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं’, आमिर खानच्या भावावर अभिनेत्रीचे आरोप
बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक मोठ्या अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये अनेक वाईट अनुभवांना तोडं दिलं आहे. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ईवा ग्रोवर. अभिनेत्री इवा ग्रोवरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी पती आणि अभिनेता आमिर खानचा सावत्र बंधू हैदर अली खान विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने हैदर अली खानच्या […]
26 वर्षानंतर ‘मोहब्बतें’मधील समीर कसा दिसतो? फोटो पाहून व्हाल थक्क, या देशात राहून छापतोय पैसा
शाहरुख खान अभिनीत 'मोहब्बतें' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 26 वर्षे उलटली असली तरी आजही प्रेक्षकांमध्ये त्याची लोकप्रियता कायम आहे. या चित्रपटात समीरची भूमिका साकारून अभिनेता जुगल हंसराज रातोरात चर्चेत आला होता. त्याच्या निरागस व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र, मोहब्बतेंच्या यशानंतरही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. एका मुलाखतीत जुगल हंसराजने सांगितले होते की, […]