प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अलायन्स’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला असताना बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने त्यात एण्ट्री घेतली. भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी तो या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी खान भावंडांमध्ये अत्यंत भावनिक संवाद झाला. या शोमध्ये सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा सहभागी झाली होती. […]
entertainment
ब्लाऊज घालायला लावला नसता तर…, सीतेच्या कॉस्च्युम ट्रोलिंगवर ‘रामायण’मधील अभिनेत्री म्हणते, ‘सर्वांना खूश नाही ठेऊ शकत’
अभिनेता रणबीर कपूर, सनी देओल आणि यश स्टारर ‘रामायण’ सिनेमाचा पहिला पार्ट यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, पण सोशल मीडियावर ट्रोलिंगची देखील सुरुवात झाली आहे. आता सिनेमातील कलाकारांच्या कॉस्च्युमवरुन वाद टोकाला पोहोचले आहेत. सिनेमातील सीता (साई पल्लवी) आणि कैकेयी (लारा दत्ता) यांच्या कपड्यांवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या कपड्यांवरुन […]
‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर! 10 ऑगस्टपासून मोठा बदल
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतल्या प्रेक्षकांना गेली आठ वर्षे खळखळून हसवणारी, प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य भाग झालेली आणि मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक असलेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठ वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या उंबरठ्यावर पोहोचत आहे. या अविस्मरणीय प्रवासात एक हजारहून अधिक भाग […]
Pradeep Rawat : ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत यांच्या निधनाचं कारण काय? मॅनेजरने केलं स्पष्ट
‘लगान’, ‘गजिनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. अभिनेते यशपाल शर्मा यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. त्यांचे मॅनेजर सिद्धार्थ तिवारी यांनी त्यांच्या निधनाचं कारण स्पष्ट केलं आहे. “चार वर्षांपूर्वी […]
Amruta Khanvilkar : लग्नाच्या 11 वर्षांनंतर मोडणार अमृताचा संसार, क्रिप्टिक पोस्ट करत म्हणाली, ‘प्रेम हरवलं…’
Amruta Khanvilkar : इंडस्ट्रीमध्ये कधी कोणाचं नातं जुळेल आणि कधी कोणाच्या नात्याचा अंत होईल काहीही सांगता येत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता आणि पती हिमांशू मल्होत्रा आता एकत्र राहत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. […]
Kangana Ranaut: जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने कंगना यांना मारहाण? व्हिडीओमागील सत्य समोर
अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने त्यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. कंगना यांच्या अशा वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर घोळक्याने हल्ला […]