नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या धक्कादायक कारनाम्यांवर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटात त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारताना दिसू शकतात, अशी जोरदार चर्चा […]
entertainment
‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांची भूमिका साकारण्यास मोहन जोशी यांनी का दिलेला नकार?
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेव्हा 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासूनच त्यात स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होता. 'देऊळ बंद' या पहिल्या भागात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका साकारली होती, आणि आता सीक्वेलमध्येही तेच या भूमिकेत आहेत. मात्र सुरुवातीला त्यांनी या भूमिकेला नकार दिला होता. प्रवीण तरडे […]
प्रत्येक ब्रेकअप झालेल्या मुलाच्या मोबाईलमध्ये ऐकाला मिळतं 48 वर्ष जुन गाणं, आजही या गाण्याचे लाखो चाहते
जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. त्या काळातील गाणी ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती चित्रपट आणि कलाकारांची ओळख बनत असत. अनेक दशकांनंतरही ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे 'ओ साथी रे'. 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील हे गाणे आजही […]
इंडस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंह पोहोचला चामुंडेश्वरी मंदिरात; केली पूजा
फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधी माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंह मोठ्या वादात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरवर थेट बंदी घातली आहे. चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना त्याच्यासोबत काम करू नये असे निर्देश देण्यात आला आहे. या मोठ्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी रणवीर म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात […]
रणवीर सिंहवर बंदी घालणारी FWICE संघटना काय? या पूर्वी दोन कलाकारांवरही होता बॅन
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. धुरंधर आणि धुरंधर 2 सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर रणवीरवर फिल्म इंडस्ट्रीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने सोमवारी ही बंदी घातली आहे. ‘डॉन ३’चे शूटिंग सुरू होण्याच्या काही आठवडे आधीच अभिनेत्याने हा चित्रपट सोडला, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. […]
अनन्या पांडेच्या भरतनाट्यम डान्सवरून सोशल मीडियात वाद; चंकी पांडे यांनी दिले स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या ‘Chaand Mera Dil’ या चित्रपटातील एका डान्स सीनमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. चित्रपटातील भरतनाट्यम फ्युजन परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. काही प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकारांनी या सादरीकरणाला दुःखद आणि विनाशकारी असेही म्हटले. या संपूर्ण वादावर आता अनन्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया […]