• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cast Fees : कालीन भैयांना कोट्यावधी, मुन्ना भैया-गुड्डू पंडितला किती मिळाली रक्कम ? ‘मिर्जापुर द मूव्ही’ च्या स्टारकास्टची कमाई किती ?

August 12, 2026 by admin Leave a Comment


Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर’ म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती एकच गोष्ट—गादी! आणि त्या गादीसाठी होणारी रक्तरंजित, भौकाली आणि जबरदस्त लढाई. आता हीच लढाई वेब सीरिजमधून थेट मोठ्या पडद्यावर पोहोचणार आहे. हो, हे खरं आहे, कारण ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची जोरदार तयारी सुरू असून, ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सगळ्यात विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘मिर्झापूर’च्या जुन्या आणि लोकप्रिय पात्रांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. म्हणजेच कालीन भैया, गुड्डू पंडित, मुन्ना त्रिपाठी आणि गोलू गुप्ता यांसारखी पात्रं पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्याच जुन्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. पण यावेळी गेममध्ये काही नवीन खेळाडूही उतरले आहेत. जितेंद्र कुमार आणि रवी किशन यांसारख्या कलाकारांची एन्ट्री झाल्यामुळे मिर्झापूरचा खेळ आणखी रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

याचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला. कारण या पात्रांची ताकद आणि त्यांचा भौकाली अंदाज प्रेक्षकांना आधीपासूनच माहिती आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मोठा धमाका करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कलाकारांच्या फीची चर्चा सुरू !

या चित्रपटात कोणाची एन्ट्री किती दमदार आहे, यासोबतच आता कोणाच्या खात्यात किती कोटी जमा झाले, याचीही चर्चा रंगली आहे. या शर्यतीत सर्वात पुढे आहेत अर्थातच कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठी! मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठी यांनी ‘मिर्झापूर: द मूव्ही’साठी तब्बल 15 कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे मिर्झापूरच्या गादीवरच नाही, तर फीच्या बाबतीतही कालीन भैया सगळ्यांवर भारी पडले आहेत!

तर ‘मुन्ना भैया’ म्हणून चाहत्यांच्या मनात घर केलेला दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा या आयकॉनिक भूमिकेत परतत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्येंदू शर्मा यांना या चित्रपटासाठी तब्बल 3 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे मुन्ना भैया परत येणार आणि खिशातही कोट्यवधी रुपये घेऊन जाणार!

गुड्डू पंडितची कमाई किती ?

त्यानंतर नंबर येतो तो गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल याचा. मिर्झापूरच्या गादीसाठी सर्वात आक्रमकपणे लढणाऱ्या गुड्डूची क्रेझ आजही तितकीच कायम आहे. रिपोर्ट्सनुसार, अली फजल यासा या चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपयांच्या आसपास मानधन मिळाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे एकीकडे कालीन भैयांची 15 कोटींची ताकद आणि दुसरीकडे गुड्डूची 3-4 कोटींची बाजी—पण शेवटी गादी कोण घेणार, हा खरा सवाल आहे !

तसेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठी पुन्हा एकदा गोलू गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. मिर्झापूरच्या संपूर्ण खेळात गोलूचं पात्र किती महत्त्वाचं आहे, हे चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. रिपोर्ट्सनुसार, श्वेता त्रिपाठी हिला चित्रपटासाठी जवळपास 95 लाख रुपये मानधन मिळालं आहे.

या फ्रँचायझीमध्ये जितेंद्र कुमार यांचीही एन्ट्री झाली आहे. ते बबलू पंडितच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, या भूमिकेसाठी जितेंद्र कुमार यांनी तब्बल 1.5 कोटी रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.

एकीकडे कलाकारांच्या फीची चर्चा सुरू असतानाच चित्रपटाच्या बजेटबाबतही एक मोठा दावा समोर आला आहे. Flickonclickच्या एका रिपोर्टनुसार, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ तब्बल 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. आता 250 कोटींचा हा खर्च बॉक्स ऑफिसवर किती कमाईत बदलतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in