• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bollywood Copied Songs : ‘मुन्नी बदनाम-चोली के पीछे क्या है’, बॉलिवूडच्या अनेक गाण्यांचं कनेक्शन थेट पाकिस्तनशी

June 21, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Copied Songs : बॉलिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या चित्रित करण्यात आलेला ‘सौतन की बेटी’ सिनेमातील ‘हम भूल गए हर बात’ हे गाणं आजही अनेकांच्या तोंडावर आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास 35 वर्षे उलटली असली, तरी आजही ते मनाला भिडतं. पण अनेकांना महिती देखील नाही, की हे गाणं मूळतः पाकिस्तानच्या दिग्गज पार्श्वगायिका नसीम बेगम यांनी गायले होते? 1960 सालचा काळ होता आणि ‘सहेली’ (Saheli) या सिनेमा “हम भूल गये हर बात” (Hum Bhool Gaye Har Baat) हे गाणं पहिल्यांदा ऐकायला मिळालं होतं. केवळ हेच गाणं नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी अनेक लोकप्रिय गाणी आहेत ज्यांचा कनेक्शन थेट पाकिस्तानशी आहे.. तर ती कोणती बॉलिवूड गाणी आहेत, ते पाहू…

बहुत प्यार करते हैं तुमको सनम (साजन)

सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित अभिनीत ‘साजन’ हा सिनेमा फक्त आणि फक्त गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गायिका अनुराधा पौडवाल यांचा जादुई आवाज असलेला “बहुत प्यार करते हैं तुमको सनम” हा गां 1991 मध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. हे गाणे संपूर्णपणे “बहुत बहुत सूरत है मेरा सनम” वरून प्रेरित आहे, हे गाणे पाकिस्तानी गायक हसन-मेहाई या दिग्गज गायकाने गायलेलं आहे.

चोली के पीछे क्या (खलनायक)

चोली के पीछे क्या आजही अनेक कार्यक्रमांमध्ये वाजतं. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या सुपरहिट ‘खलनायक’ सिनेमामधील “चोली के पीचे क्या है” हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप लोकप्रिय ट्रॅक आहे. पण या गाण्याचं कनेक्शन थेट पाकिस्तानशी आहे… पाकिस्तानी गायिका नूर जहाँ यांनी गायिलेलं “रात के बारह बाजे” खूप चर्चेत होतं. “चोली के पीचे क्या है” आणि “रात के बारह बाजे” च्या गाण्यांमध्ये फरक असला तरी, गाण्यांच्या तालबद्ध पद्धती सारख्याच वाटतात.

मुन्नी बदनाम हुई (दबंग)

अभिनेता सलमान खान याचा सुपरहिट ‘दबंग’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलंच, पण ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्याने तर सर्वांना वेड लावलं होतं… पण हे गाणं मूळचं पाकिस्तानचं आहे. पाकिस्तानी फिल्म ‘मिस्टर चार्ली’ (1992) मधील ‘लड़का बदनाम हुआ हसीना तेरे लिए’ गाण्यातून प्रेरणा घेऊन ‘मुन्नी बदनाम हुई’ गाणं तयार करण्यात आलं होतं, जे प्रचंड हिट ठरलं.

याच प्रमाण ‘नाच पंजाबन’ (जुग जुग जियो), ‘आहूं आहूं’ (लव आज कल), ‘डिस्को दिवाने’ (स्टूडेंट ऑफ द ईयर), ‘दिल दिल हिंदुस्तान’ (यादों का मौसम) आणि ‘इन दिनों’ (लाइफ इन मेट्रो), अशी अनेक बॉलीवूड गाणी आहेत ज्यांचा पाकिस्तानच्या संगीत क्षेत्राशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे खास कनेक्शन आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच…
  • मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in