• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bobby Deol : पूजा भट्टनंतर बॉलिवूडमधल्या अजून एका मुलीने दिली बॉबी देओलसोबतच्या प्रेमाची कबुली, तिने निलमचं सुद्धा नाव घेतलं

July 4, 2026 by admin Leave a Comment


पूजा भट्ट नंतर बॉलिवूड कुटुंबाशी संबंधित असलेल्या अजून एका मुलीने बॉबी देओल सोबत अफेअरची कबुली दिली आहे. संजय खान आणि झरीन खान यांची मुलगी फराह खान अलीने बॉबी सोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. फराह खान अली आणि बॉबी देओलचच्या लव लाइफ बद्दल अनेक दावे केले जायचे. असं म्हटलं जातं की, नीलम कोठरीमुळे त्यांचं ब्रेकअप झाला. या सर्व चर्चांवर आता फराह खान अली बोलली आहे. माझं आणि बॉबी देओलचं किशोरवयीन प्रेम होतं. डेटिंगपेक्षा ते बिलकुल वेगळं होतं. बॉबी देओलच्या आयुष्यात निलम आल्यामुळे ब्रेकअप झाला, यावर सुद्धा फराह खान अली बोलली.

इंटरव्यूमध्ये फराह फक्त बॉबी आणि तिच्या नात्याबद्दलच बोलली नाही, तर ती इतर गोष्टींवर सुद्धा बोलली. “आम्ही बालपणीपासून परस्परांच्या प्रेमात होतो. माझं बॉबीवर क्रश होतं. आम्ही हात पकडायचो. एकमेकांना चिठ्ठ्या लिहायचो. फक्त डेटिंगवर गेलो नाही. त्यावेळची परिस्थिती आजच्यासारखी नव्हती” असं फराह म्हणाली. “मी 16 वर्षांची तो 17 वर्षांच. ही तब्बल 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आयुष्य खूप वेगळं होतं. आज वयाच्या 16 व्या, 17 व्या वर्षी असं नसतं” असं फराह म्हणाली. फराह पेशाने ज्वेलरी डिझायनर असून सुजैन खानची बहिण आहे. बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या सोबत माझं आज चांगलं नातं आहे. दोघेही माझे जवळचे मित्र असल्याचं फराह खान अली म्हणाली.

निलममुळे ब्रेकअप झालं का?

निलममुळे ब्रेकअप झालं का? त्यावर सुद्धा फराह खान अली बोलली. “निलमही माझी एक चांगली मैत्रीण आहे. आमच्यात कुठेलही मतभेद नाहीत. माझं आणि बॉबीचं टीनएज किशोरवयीन प्रेम संपल्यानंतर निलम कोठारीची एन्ट्री बॉबीच्या आयुष्यात झाल्याचं तिने सांगितलं” 90 च्या दशकात अशा चर्चा होत्या की, निलम आणि बॉबी देओल जवळपास पाच वर्ष सीरियस रिलेशनशिपमध्ये होते.

पूजा भट्ट काय म्हणालेली?

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टने बॉबी देओलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची एका मुलाखतीत कबुली दिली होती. बॉबी सोबतची रिलेशनशिप म्हणजे माझ्यासाठी ती आयुष्यातील जादुई वेळ होती असं पूजा म्हणालेली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in