• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bigg Boss Marathi 6 Finale : पाच लाख रुपये नाकारणं पडलं महागात; टॉप 5 मधून कोण बाहेर?

April 19, 2026 by admin Leave a Comment


‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेमध्ये पाच स्पर्धक पोहोचले होते. राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, तन्वी कोलते आणि अनुश्री माने या पाच जणांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली होती. या पाच स्पर्धकांसमोर सूत्रसंचालक रितेश देशमुखने मोठी ऑफर ठेवली होती. ब्रीफकेसमध्ये पाच लाख  रुपयांचा चेक होता आणि बझर दाबून कोणत्या तरी एका स्पर्धकाला तो चेक घरी न्यायचा होता. परंतु पाचही स्पर्धकांनी तो चेक स्वीकारायला नकार दिला होता. अखेर ज्या स्पर्धकाला सर्वांत कमी मतं मिळाली, त्याला घराबाहेर पडावं लावलं. रितेशने जो लिफाफा उघडला, त्यात दिपाली सय्यदचं नाव होतं. ब्रीफकेसमधील चेक कोणी स्वीकारावा, असा प्रश्न घरातील सर्व माजी स्पर्धकांनाही विचारण्यात आला होता. तेव्हा बहुतांश स्पर्धकांनी दिपालीचं नाव घेतलं होतं. तरीसुद्धा तिने चेक घेणं नाकारलं होतं.

बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतर दिपाली म्हणाली, “आत शंभर दिवस राहणं खूप कठीण आहे. घरात असताना माझ्या सासूबाई आजारी होत्या, त्यांना विचारूनच मी बिग बॉसमध्ये आले होते. मधल्या काळात जे घडलं, तेव्हा मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु एकदा का प्रवास सुरू केला, की शंभर दिवस पूर्ण करूनच मी बाहेर येईन असं ठरवलं. मी आत शंभर दिवस राहिले, हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे. कारण मी सतत काहीतरी जिद्दीने करत असते, हे त्यांना माहीत आहे. मी बिग बॉसमध्येही छान खेळेन, असा विश्वास त्यांना होता.” दिपालीने जरी पाच लाख रुपये नाकारले असले तरी बिग बॉसकडून तिला एक लाख रुपयांचा चेक मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी त्याने रितेशचं आणि शोचं कौतुक केलं. “रितेश माझ्या छोट्या भावासारखा आहे. मी त्याला गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ओळखतो. रितेशला इथे बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करताना पाहून मला खूप आनंद होतोय. या शोचं सूत्रसंचालन रितेशइतकं दमदार कोणी दुसरं केलंच नसतं. मी सोशल मीडियावर या शोला ट्रॅक करतोय आणि नुकताच हा सर्वाधिक पाहिलेला शो ठरल्याचंही समजतंय”, अशा शब्दांत अभिषेक बच्चन व्यक्त झाला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणकडून भारताच्या जहाजावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, पत्रकाराची थेट हकालपट्टी
  • युद्धात भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, इराण-अमेरिका मिळून पाकिस्तानात…होर्मुझचा संघर्ष संपणार?
  • PPF: निवृत्तीनंतर आरामात जगा, महिन्याला मिळतील 61,000, पीपीएफची भन्नाट योजना
  • डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांत भयंकर धमकी, पाकिस्तानात अटी मान्य न केल्यास आता…इराणमध्ये थेट मृत्यू तांडव!
  • फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून…अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in