• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bigg Boss 20 : येतोय रिऍलिटी शोजचा बाप, सलमानकडून मोठी हिंट, काय असेल सरप्राईज?

August 5, 2026 by admin Leave a Comment


Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ शोची प्रतिक्षा आता संपली आहे… अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो लवकरच टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडकणार आहे. निर्मात्यांनी शोचा अधिकृत प्रोमो देखील जारी केला आहे. ज्यामध्ये सलमान खानची एन्ट्री खास ठरत असून, प्रोमोमध्ये शोच्या प्रीमियरची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. सध्या ‘बिग बॉस 20’ मध्ये सलमान खान याची एन्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. प्रोमोमध्ये अभिनेता आयकॉनिक ‘करण अर्जून’च्या लूकमध्ये घोड्यासोबत एन्ट्री घेताना दिसत आहे. ज्यामध्ये त्याच्या अंदाजात, सलमान खान म्हणतो, ‘जे करण अर्जुन मध्ये झालं, ते पुन्हा हेणार… तथास्तु!’

‘बिग बॉस 20’ बद्दल सलमान खान म्हणतो, ‘बिग बॉसचा प्रत्येक सीझन एक नवीन खेळ, नवीन डायनामिक्स आणि अनपेक्षित ट्विस्ट घेऊन येत असतो.. पण यंदाच्या सीझनमध्ये असे काही ट्विस्ट असणार आहेत, जे आजपर्यंत तुम्ही कोणत्याच सीझनमध्ये अनुभवले नसतील. पहिला इशारा तुमच्यापर्यंत आला आहे… याला दोन वेळा पाहण्याची गरज आहे… टीझर तर फक्त एक सुरुवात आहे. आता तर खूप काही पाहणं गरजेचं आहे…’, असं देखील सलमान खान म्हणाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

 

बड्या सेलिब्रिटींची नावे स्पर्धक म्हणून चर्चेत…

मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी जन्नत झुबैर, माही विज, गीता बसरा, कॉमेडियन सुनील पाल आणि कटेंट क्रिएटर शोइक चक्रवर्ती यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांसोबत चर्चा अंतिम टप्प्यावर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडिया स्टार मिस्टर फैसू, फैज बलोच, भाव्या सिंग, मॅक्सटर्न आणि दुष्यंत कुकरेजा यांची नावेही निर्मात्यांच्या यादीत आहेत. मात्र, यापैकी कोणीही अद्याप शोमधील सहभागाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 20’चा भव्य प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच, टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वी हा शो सर्वप्रथम ‘जिओ-हॉटस्टार’वर (JioHotstar) स्ट्रीम केला जाईल. याचा अर्थ असा की, या ‘डिजिटल-फर्स्ट’ फॉरमॅटमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in