• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BCL 2026: एमपी टायगर्सने मुंबई मरीन्सला 8 गडी राखून नमवलं, अमन पटेलची शतकी खेळी पडली भारी

June 10, 2026 by admin Leave a Comment

Big Cricket League Season 2: बिग क्रिकेट लीग स्पर्धत उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी चुरशीची लढाई आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात युपी ब्रृज स्टार्सने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तर उर्वरित तीन संघासाठी चुरशीची लढाई आहे. असं असताना या स्पर्धेतील 12वा सामना एपी टायगर्स आणि मुंबई मरीन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात एपी टायगर्सने मुंबई मरीन्सला मात दिली. या सामन्यात मुंबई मरीन्सने एपी टायगर्ससमोर 206 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. मुंबईकडून साकेत शर्माने 56 चेंडूत 96 धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. त्याच्या या खेळीमुळे 206 लक्ष्य ठेवलं गेलं. पण हे लक्ष्य एमपी टायगर्सने फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात अमन पटेलने शतकी खेळी केली साकेतच्या खेळीवर भारी पडली. त्याच्या शतकी खेळीमुळे एपी टायगर्सने मुंबईच्या पारड्यातील विजय खेचून आणला.

मुंबई मरीन्सने विजयाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमन पटेलने आक्रमक खेळी केली. समोर जो गोलंदाज दिसेल त्याच्यावर प्रहार केला. त्याने फक्त 56 चेंडूत 101 धावांची खेळी केली. एपी टायगर्सने मुंबई मरीन्सने दिलेलं लक्ष्य 18.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. अमन पटेलने शतकी खेळी केल्यानंतर बिग क्रिकेट लीग 2026 स्पर्धेतील प्लेटिनम बजर मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या विजयात फक्त अमनचं योगदान होतं असं नाही. या सामन्यात राहुल यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या खेळीमुळे एमपी टायगर्सचा विजय सोपा झाला. त्याला या खेळीसाठी ब्राँझ बजर प्रदान केलं गेलं.

सतीश पुनिया-जयाप्रदा उपस्थित होते

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश पुनिया, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती जया प्रदा यांच्यासह सामन्यादरम्यान विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी खेळाडू, अधिकारी आणि चाहत्यांची भेट घेतली आणि लीगची प्रशंसा केली. याप्रसंगी बोलताना सतीश पुनिया म्हणाले, “बिग क्रिकेट लीग देशभरातील प्रतिभावान खेळाडूंना अनुभवी क्रिकेटपटूंसोबत आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. अशा उपक्रमांमुळे भारताची क्रीडा परिसंस्था मजबूत होते आणि तरुणांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. मी दोन्ही संघांचे एका शानदार सामन्याबद्दल अभिनंदन करतो आणि विशेषतः ज्या खेळाडूंनी आज मैलाचे दगड गाठले त्यांचे कौतुक करतो.”

दरम्यान, जया प्रदा म्हणाल्या की, “मैदानावर खेळाडूंचा उत्साह, समर्पण आणि प्रतिभा पाहणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे. अमन पटेलचा प्लॅटिनम बझर विजय आणि दोन्ही संघांची प्रभावी कामगिरी हे दर्शवते की, बिग क्रिकेट लीग नवीन प्रतिभेला प्रगती करण्याची संधी कशी देत ​​आहे. या अद्भुत कार्यक्रमाबद्दल मी सर्व खेळाडू आणि आयोजकांचे अभिनंदन करते.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in