• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Balen Shah : भारत विरोधातील डाव नेपाळी पंतप्रधान बालेन शाह यांच्यावरच उलटला, आधी ब्रिटनने उभं केलं नाही, आता अजून एका देशाने दिला झटका

June 2, 2026 by admin Leave a Comment


भारत-नेपाळ संबंध सुधारण्यापेक्षा नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांना भारतासोबत नवनवीन वाद उकरुन काढण्यात जास्त रस दिसत आहे. आधी त्यांनी भारतातून आयात होणाऱ्या सामानावर सीमा शुल्क वाढवलं. आता सीमावादाचा विषय उपस्थित केला आहे. त्यात स्वत:च्याच एका वक्तव्यामुळे ते नेपाळच्या विरोधी पक्षांच्या रडारवर आले. “पंतप्रधान झाल्यावर मला कळलं की, नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागावर कब्जा केला आहे” असं वक्तव्य करुन त्यांनी नेपाळ मधल्या विरोधी पक्षांच्या हातात आयातं कोलीत दिलं. नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या या स्टेटमेंटला राष्ट्रद्रोही ठरवलं. भारत-नेपाळ सीमाप्रश्न आंतरराष्ट्रीय बनवण्याचा त्यांचा इरादा आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यात अजिबात यश मिळणार नाही. उलट त्यांना झटके सहन करावे लागतायत.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत-नेपाळ सीमावादात तिसऱ्या देशाची एन्ट्री करण्याचे भरपूर प्रयत्न करत आहेत. आधी त्यांनी ब्रिटनला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. सुगौली कराराचा हवाला देत ब्रिटनही एक पक्षकार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण ब्रिटनने त्यांची विनंती फेटाळून लावली. हा भारत-नेपाळमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचं ब्रिटनने म्हटलं. त्यानंतर आता ते चीनला या विषयात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चीनने सुद्धा मध्यस्थीसाठी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सीमावादाच्या विषयातून राष्ट्र भावनेला हात घालण्याचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट येताना दिसतोय.

‘आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही’

“मी चीन आणि ब्रिटनशी संपर्क साधला. सीमावाद सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे” असं रविवारी बालेन शाह नेपाळी संसेदत बोलताना म्हणाले होते. बालेन शाह यांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यांजंकर यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी काठमांडूमध्ये ब्रिटिश राजदूत रॉब फेन यांची भेट घेऊन भारत-नेपाळ सीमावादात मध्यस्थीची मागणी केली होती. द टेलीग्राफने नेपाळमधील ब्रिटनचे राजदूत रॉब फेन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं होतं. सीमावाद हा भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय विषय आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही असं फेन यांनी नेपाळी पंतप्रधानांच्या सल्लागारांना सांगितलं. थेट असं सांगणं म्हणजे बालेन शाह यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का होता.

कुठलं अधिकृत स्टेटमेंटही दिलं नाही

1816 मध्ये सुगौली करार झाला. यात भारत-नेपाळची सीमा निश्चित करण्यात आली होती. बालेन शाह यांनी चीनकडे मदत मागितली होती. पण चीनने काही उत्तर दिलं नाही. चीनने यावर कुठलं अधिकृत स्टेटमेंटही दिलं नाही. यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे वेळोवेळी नेपाळ चीनवर सुद्धा जमीन बळकवल्याचा आरोप करत असतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in