• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Balen Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह अखेर झुकले, भारतासोबत केलं असं काही…, थेट चीनच्या तळपायाची आग मस्तकात

August 10, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी आज सिंह दरबार येते पंतप्रधान कार्यालयात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीमध्ये भारत आणि नेपाळ संबंधामधील विविध पैलूंवर चर्चा झाली. ज्यामध्ये भारत नेपाळ परस्पर संबंध, विविध करार आणि सहकार्य या विषयांचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना शुभेच्छा दिल्या, तसेच भारत आणि नेपाळमधील परस्पर संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचंही यावेळी श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. या भेटीबाबत बोलताना भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी म्हटलं की, मी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांची भेट घेतली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, यावेळी भारत आणि नेपाळमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आला, अशी माहिती यावेळी श्रीवास्तव यांनी दिली आहे.

दरम्यान बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर असं पहिल्यांदाच घडत आहे, की त्यांनी एखाद्या देशाच्या राजदूताची वैयक्तिकरित्या भेट घेतली आहे. यापूर्वी त्यांनी राजदूतांची भेट घेणं टाळलं होतं, त्यांनी अमेरिकेचे राजदूत सर्गियो गोर आणि भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची देखील भेट घेतली नव्हती, समकक्षासोबतच चर्चा होईल, अशी त्यांची आधीची भूमिका होती, मात्र अचानक बालेन शाह यांचे सूर नरमल्याचं पहायला मिळत आहे, त्यांनी आज भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांच्यासोबत चर्चा केली आहे.

ही भेट आणखी एका अर्थाने महत्त्वाची आहे, ती म्हणजे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी चीनी राजदूताच्या आधी भारताचे राजदूत श्रीवास्तव यांची भेट घेतली आहे. डिप्लोमसी स्थरावर अशा घटना महत्त्वाच्या मानल्या जातात. यावरून नेपाळची पुढची दिशा कशी असेल, याचा देखील अंदाज येतो. दरम्यान आता भारताच्या राजदूतांची भेट घेतल्यानंतर आजच बालेन शाह हे चीनच्या राजदूतांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमेरिकेच्या राजदूतांना देखील भेटणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in