अभिनेता इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच 'आवारापन 2'ची कमाई 50 कोटी रुपयांवर पोहोचली होती. 'आवारापन 2'ने दोन किंवा चार नाही तर तब्बल […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक, अक्षय कुमार लागला तयारीला? नेमकं सत्य काय?
सध्या राज्यात आणि सोशल मीडियावर एकाच ‘फायरब्रँड’ IAS अधिकाऱ्याची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी कारवायांचा धडाकाच सुरू ठेवला आहे. भेसळयुक्त दूध, पनीर, रेस्टॉरंट, प्रतिबंधित गुटखा, नियमांचं पालन न करणाऱ्या ब्लिंकिट यांवर एफडीएकडून कारवायांचं सत्र सुरूच आहे. एक आदर्श अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची ओळख […]
LPG Cylinder: सरकारचं मोठं पाऊल, LPG सिलिंडरबाबत पहिल्यांदाच घेतला असा निर्णय, तुम्हीही व्हाल टेन्शन फ्री
पश्चिम आशियाई संघर्षादरम्यान आयात केलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानंतर, देशांतर्गत पेट्रोलियम गॅस (LPG) उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने प्रथमच प्रत्येक रिफायनरी आणि तेल व वायू कंपन्यांसाठी कमाल उत्पादन लक्ष्य निश्चित केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या 13 ऑगस्टच्या आदेशानुसार, 21 रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी दररोज एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. […]
Ananya Raj Death: झोपेतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू, वयाच्या 27व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या 27व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनन्याचा मृत्यू सुमारे एक महिनापूर्वीच झाला होता, पण तिच्या कुटुंबीयांनी ही बातमी आतापर्यंत लपवून ठेवली होती. आता तिच्या कुटुंबीयांनी अनन्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून तिच्या निधनाची बातमी […]
महिला कार्यकर्त्यांनी भर सभेत सुनेत्रा पवार यांना I LOVE YOU वहिनी म्हटलं, उपमुख्यमंत्री हसल्या, अन् नंतर म्हणाल्या…
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा उद्योगनी अॅपचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र यावेळी अॅपपेक्षाही चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील एका भावनिक संवादाची. भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार चांगल्याच भाऊक झाल्याचं पहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, भाषणावेळी कार्यकर्ते देखील चांगलेच भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी […]
Maharashtra News LIVE : हायकोर्ट परिक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम
हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन काल मोठा गोंधळ झाला. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होते, काही ठिकाणी किबोर्ड खराब होता. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी या विरोधात छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागात आंदोलन केलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सुद्धा या आंदोलनात उतरले. अखेर रात्री हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत नोटीस […]