नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. मराठा समाजाच्या नेत्यांना खडेबोल सुनावताना मनोज जरांगे पाटील दिसले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मंत्री, आमदारांनी मराठा, कुणबींचे नुकसान करू नये. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे काम बंद करा. मराठा आणि कुणबींच्या लेकरांचे वाटोळे करू नका. धनगर समाजाने माझ्याकडून व्हावे, ओबीसींनी माझ्याकडून व्हावे, असे मी अजिबातच म्हणत […]
Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. संघटनांच्या मते, त्यांच्या अनेक प्रमुख मागण्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. यामध्ये पाच दिवसांचे बँकिंग, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन (PLI) आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित मुद्दे प्रमुख आहेत. UFBU ही नऊ बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची संयुक्त संघटना […]
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील कांदिवली येथे एका मराठी रिक्षाचालकाला अमराठी रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश बंडू शेजवळ असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. हिंदुस्तान नाका परिसरात भाडे घेऊन जात असताना, काही अमराठी रिक्षाचालकांनी त्यांची रिक्षा अडवून त्यांना मारहाण केली. रिक्षाचा वायपर तोडण्यात आला आणि शेजवळ यांच्या ओठाला दुखापत झाली. हल्लेखोरांनी रिक्षा बंद ठेवण्यास सांगितले असता, […]
भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
दिल्लीतील ITO ट्रॅफिक सिग्नलजवळ रविवारी रात्री एका भीषण रस्ते अपघातात स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये शिरली. या घटनेत दोन आमदारांसह अनेक जण जखमी झाले. या अपघातामध्ये आमदार अनिल झा आणि कर्नाटकातील आमदार अभय पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने दोन्ही आमदारांसह […]
भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
थलपती सी. जोसेफ विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. विजय यांच्या पक्षात नेत्यांसहित सेलिब्रिटींची एन्ट्री सुरूच आहे. केरळमधील एका अभिनेत्यानेही भाजपची साथ सोडली आहे. आता अभिनेते देवन हे भाजपमधून आता टीव्हीके पक्षात जाण्याची शक्यता आहे. टीव्हीके पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं की, मी भाजपसाठी आक्रमकपणे कताम करत होतो. अनेक […]
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्याच जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवरचा मोठा भार कमी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना ही यादी आल्यानंतर पुढच्या कामालाही लागता येणार आहे. त्यामुळे […]