महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याविरोधात ठाकरेसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. दादरमधील शाखा क्रमांक 191 समोर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने सहभाग घेतला. […]
IND vs AFG: मोहम्मद सिराजचा टीम इंडियातून पत्ता कट होणार? जाणून घ्या कारण
टीम इंडियाने अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून मुल्लानपूरमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला कसोटी सामन्यात खेळता येणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सिराजला दुखापतीमुळे या […]
Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय
आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत इशान किशनने संघाची धुरा सांभाळली. त्याने संघाला चांगलं नेतृत्व दिलं. स्पर्धेच्या मध्यात पॅट कमिन्स परतला आणि धुरा त्याच्याकडे गेली. आता आयपीएल 2027 स्पर्धेसाठी कंबर कसली जात आहे. यासाठी 10 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना कर्णधारपदाची माळ इशान किशनच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्याला फुलटाईम कर्णधारपद सोपण्यात येण्याची […]
370च्या बिर्याणीच्या बदल्यात GFसोबत शारीरिक संबंध; प्रणित मोरे आधी जोकवर हसला आता मागतोय माफी
कलर्स टीव्हीचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 19’ फेम कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका गंभीर वादात अडकला आहे. खरं तर, हे प्रकरण त्याच्या ‘क्राउडवर्क’ (Crowdwork) शोशी संबंधित आहे. या शोमध्ये एका प्रेक्षकाने केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणीवर प्रणितने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडली नाही. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी या कॉमेडियनला धारेवर धरायला सुरुवात केली, […]
तृणमूलचे 59 आमदार फूटणार? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय, बंगालच्या राजकारणात भूकंप!
TMC MLA Revolt : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा या दोन आमदारांना पक्षातून काढलं आहे. त्यानंतर जवळपास ५९ पेक्षा जास्त आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडी […]
लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा
विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल […]