अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. “मी स्वत: या ऐतिहासिक VVIP दौऱ्याच्या तयारीला अंतिम रुप देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये बहुप्रतीक्षित ट्रेड डील (व्यापार करार) लवकरात लवकर फायनल करण्यासाठी भारतात येत आहे” असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प […]
‘स्क्रिनप्ले किंग’ हरपला! सिनेसृष्टीची 50 वर्षे गाजवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्याचे निधन
साउथ सिनेमातील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक भाग्यराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाग्यराज यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. भाग्यराज हे असे फिल्ममेकर होते ज्यांनी सुमारे पाच दशके उत्तम करिअर घडवले आणि तमिळ सिनेमाला आपल्या योगदानाने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त […]
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस… खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली; आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्याआधी ते माध्यमांसमोर व्यक्त झाले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान ते मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या विमानावरील प्रवासाबद्दलही बोलले. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच इतर नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकाच […]
Ketan Agarwal Murder Case : सिया आणि चेतन गुप्तपणे पुन्हा लोहगडावर, दोन रस्ते आणि… नेमकं काय घडलं?
केतन अग्रवाल प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. या प्रकरणात सिया आणि चेतनसह चेतनच्या नोकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना कशी घडली? प्लान काय होता? हेतू काय होता? या कटात अजून कोण कोण सहभागी होते? सियाच्या आईवडिलांना या प्रकरणाची कल्पना होती का? […]
Ketan Murder Case: ती असं काही करेल हे स्वप्नातही वाटलं नाही… सियाचं स्थळ सुचवणाऱ्या मामाला ही मोठा धक्का… पोलीस तपासात तो मोठा दावा
Ketan Agarwal Lohgad Murder Case: देशाला हादरवणाऱ्या हायप्रोफाईल केतन अग्रवाल खून प्रकरणात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहे. 18 जून रोजी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून ढकलले होते. खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांना त्यात लव्ह ट्रँगल […]
ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास… विजय वडेट्टीवार म्हणाले, वरून आदेश आहे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल एकत्र विमानाने एकत्र प्रवास केला. दोन्ही नेते योगायोगाने एकाच विमानातून गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा राज्यात नवीन समीकरणे होणार का? या प्रवासात ठाकरे आणि फडणवीस यांची काय चर्चा झाली? अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे. या भेटीचा महाविकास आघाडीवरही काही परिणाम होणार का? अशीही […]