• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AUS vs BAN: बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने पहिल्या डावात केलं चीतपट, 153 धावांची घेतली आघाडी

August 14, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने जबरदस्त कामगिरी केली आहे. नाणेफेकीचा कौल विरोधात गेला आणि ऑस्ट्रेलियाला मनासारखा निर्णय घेता आला. तरीही बांगलादेशने पहिल्या डावावर मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करतान पहिल्या दिवस अखेर बांगलादेशने 1 गडी बाद 92 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात आणखी भर घातली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 6 गडी गमवून 351 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 153 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी यात आणखी काही धावांची भर पडणार यात काही शंका नाही. खरं तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची नाजूक स्थिती आहे. दुसऱ्या डावात काय होईल हे आता सांगणं कठीण आहे. पण पहिल्या डावात तर बांगलादेशने बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही.

बांगलादेशचा डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 198 धावांचा पाठलाग बांगलादेशने यशस्वीरित्या केला. तन्झिद हसन तमीमच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला. त्याने 197 चेंडूंचा सामना करत 101 धावांची खेळी काली. त्यानंतर नजमुल होसेन शांतो यानेही 84 धावा केल्या. त्यामुळे या दोघांच्या मोठ्या खेळीमुळे बांगलादेशचा संघ सुस्थितीत आला. त्यात मोमिनुल हक 49, मुश्फिकुर रहीमने 36 आणि मेहिदी हसन मिराझने 32 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे पहिल्या डावात बांगलादेशचं नाणं खणखणीत वाजलं आहे. बांगलादेशच्या हातात आणखी 4 विकेट्स आहेत. मेहिदी हसन मिराझ नाबाद 32 आणि हसन महमूद नाबाद 13 धावांवर खेळत आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवसात या धावसंख्येत आणखी भर पडली तर ऑस्ट्रेलियाला आघाडी मोडून काढण्याचं आव्हान असेल.

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध 8 गोलंदाजांना संधी दिली. आघाडीचे गोलंदाज असताना इतके गोलंदाज निवडल्याने हतबलता स्पष्ट दिसत आहे. मिचेल स्टार्कने 21 षटकं टाकली आणि 2 विकेट काढल्या. तर जोश हेझलवूडने 2, पॅट कमिन्सने 1 आणि नाथन लायनने 1 विकेट काढली. तर कॅमरून ग्रीन, ब्यू वेबस्टर, ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांना काही विकेट मिळाल्या नाहीत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in