
फिफा वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना खूपच रंगतदार झाला. लियोनेल मेसी मोठा खेळाडू का आहे? त्याने आपला क्लास या महत्वाच्या सामन्यात दाखवून दिला. लियोनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना इंग्लंडला नमवून फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने इंग्लंडचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. अर्जेंटिनाच्या टीमने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एकवेळ असं वाटलं की, इंग्लंडने फायनलचं तिकिट पक्कं केलय. पण मॅचच्या शेवटच्या 7 मिनिटाने गतविजेत्या अर्जेंटिनाने सिद्ध केलं की, ते चॅम्पियन का आहेत. लियोनेल मेसीने या सामन्यात एकही गोल झळकवला नाही. पण त्याच्या दोन जादुई पासच्या बळावर अर्जेंटिनाने इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवला. आता रविवारी न्यू जर्सी येथे वर्ल्ड कप किताबासाठी अर्जेंटिना आणि इंग्लंडची टीम भिडेल.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply