• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार

July 22, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमनेसामने आले. त्यानंतर झालेल्या लाठीचार्जमुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारने गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य तो मार्ग काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

अण्णा हजारे उद्या सकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात मौन आंदोलन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अण्णा हजारे ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत त्या ठिकाणाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर मंतर” असे नाव देण्यात येणार आहे. अण्णा हजारे यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आंदोलनाला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नेपाळ आला वठणीवर, भारताबाबत थेट मोठी घोषणा, बालेन शाह..
  • कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का
  • Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?
  • Supriya Sule : अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन्…; राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट
  • आज जीआर हाती नाही दिला तर… मांजरीत 600 आदिवासी विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम, काय दिला इशारा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in