• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ambani Family : फुलांची सजावट, चांदीचा झोका अन् शाही झांकी; अँटिलियातील जन्माष्टमीचा थाट पाहाच !

September 5, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रासह देशभरात सध्या गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दहीहंडीचा जल्लोष रंगला असून, लाखो रुपयांचे इनाम जिंकण्यासाठी गोविंदांची पथके एकावर एक थर रचताना दिसत आहेत. मुंबईतही दहीहंडी आणि जन्माष्टमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. घराघरांत कृष्णजन्माचा आनंद साजरा होत असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियामध्येही जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (All Photos : Social Media)

अँटिलियाची आकर्षक सजावट फुलांनी सजवलेली कृष्णाची झांकी नक्षीदार चांदीचा झोका आणि पारंपरिक सजावटीने संपूर्ण परिसराचे रूपच पालटून गेले होते. हे दृश्य पाहताना अँटिलिया नसून जणू काही प्रत्यक्ष गोकुळ अवतरल्याचा भास होत होता. मात्र या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते नीता अंबानी यांच्या मनमोहक रूपाने.

अँटिलियाची आकर्षक सजावट, फुलांनी सजवलेली कृष्णाची झांकी, नक्षीदार चांदीचा झोका आणि पारंपरिक सजावटीने संपूर्ण परिसराचे रूपच पालटून गेले होते. हे दृश्य पाहताना अँटिलिया नसून जणू काही प्रत्यक्ष गोकुळ अवतरल्याचा भास होत होता. मात्र या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते नीता अंबानी यांच्या मनमोहक रूपाने.

जन्माष्टमीच्या खास सोहळ्यासाठी नीता अंबानी यांनी पारंपरिक गुजराती पेहरावाची निवड केली होती. एक्वा-ब्लू रंगाची बांधणी साडी त्यावर केलेले नाजूक जरदोजी काम गुलाबी फुलांचा गजरा आणि आकर्षक हिऱ्यांचे दागिने यामुळे त्यांचा लूक अतिशय देखणा दिसत होता. नीता अंबानींच्या या पारंपरिक अवतारात राजेशाही थाटासोबतच श्रीकृष्णाप्रती असलेली भक्तीही प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्या या रूपामुळे अनेकांना त्यांच्यात प्रेमळ ‘माता यशोदे’ची झलक दिसली.

जन्माष्टमीच्या खास सोहळ्यासाठी नीता अंबानी यांनी पारंपरिक गुजराती पेहरावाची निवड केली होती. एक्वा-ब्लू रंगाची बांधणी साडी, त्यावर केलेले नाजूक जरदोजी काम, गुलाबी फुलांचा गजरा आणि आकर्षक हिऱ्यांचे दागिने यामुळे त्यांचा लूक अतिशय देखणा दिसत होता. नीता अंबानींच्या या पारंपरिक अवतारात राजेशाही थाटासोबतच श्रीकृष्णाप्रती असलेली भक्तीही प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्या या रूपामुळे अनेकांना त्यांच्यात प्रेमळ ‘माता यशोदे’ची झलक दिसली.

जन्माष्टमीनिमित्त अँटिलियाची खास पद्धतीने सजावट करण्यात आली होती. बालगोपालासाठी सुंदर नक्षीकाम केलेला चांदीचा झोका सजवण्यात आला होता. या झोक्यात लहानग्या कान्हाची सुंदर मूर्ती विराजमान करण्यात आली होती.

झोक्याच्या मागील बाजूस कमळाच्या फुलांवर विराजमान असलेल्या बालकृष्णाचं आकर्षक मोजॅक चित्र साकारण्यात आलं होतं. विविध रंगांच्या छोट्या तुकड्यांपासून तयार करण्यात आलेली ही कलाकृती पूजा स्थळाच्या सौंदर्यात आणखी भर घालत होती. अँटिलियामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांवर आधारित सुंदर झांकीही उभारण्यात आली होती. गुलाबी आणि पांढऱ्या ताज्या फुलांनी सजवलेल्या या झांकीला अत्यंत मोहक स्वरूप देण्यात आले होते.

कुठे फुलांच्या माळा आणि आकर्षक तोरणे दिसत होती तर कुठे मोती आणि रंगीत धाग्यांनी केलेली सजावट लक्ष वेधून घेत होती. फुलांनी सजवलेल्या लोण्याच्या मटक्या गोमातेची प्रतिमा आणि भगवान श्रीकृष्णांची मूर्ती यामुळे संपूर्ण सजावटीत कान्हाच्या बालपणीच्या लीलांचा सुंदर अनुभव मिळत होता.

कुठे फुलांच्या माळा आणि आकर्षक तोरणे दिसत होती, तर कुठे मोती आणि रंगीत धाग्यांनी केलेली सजावट लक्ष वेधून घेत होती. फुलांनी सजवलेल्या लोण्याच्या मटक्या, गोमातेची प्रतिमा आणि भगवान श्रीकृष्णांची मूर्ती यामुळे संपूर्ण सजावटीत कान्हाच्या बालपणीच्या लीलांचा सुंदर अनुभव मिळत होता.

नीता अंबानींच्या या लूकमध्ये त्यांच्या दागिन्यांनी विशेष आकर्षण निर्माण केले. त्यांनी गळ्यात गुलाबी हिऱ्यांनी सजवलेला भव्य डायमंड नेकलेस परिधान केला होता. त्यासोबत मॅचिंग डायमंड इअररिंग्सही त्यांनी घातले. हातात हिरे आणि माणिकांनी सजवलेल्या बांगड्या तसेच स्टेटमेंट रिंग्सनी त्यांच्या लूकला आणखी उठाव दिला. केसांमध्ये लावलेली डायमंड हेअर अॅक्सेसरीही विशेष लक्षवेधी ठरली.

नीता अंबानींच्या या संपूर्ण लूकमध्ये भगवान श्रीकृष्णांप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती स्पष्टपणे जाणवत होती. पारंपरिक गुजराती साज आकर्षक दागिने आणि भक्तिमय वातावरण यांचा सुंदर मिलाफ अँटिलियातील जन्माष्टमी सोहळ्याला अधिकच खास बनवणारा ठरला. त्यामुळे या सोहळ्याची झलक सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

नीता अंबानींच्या या संपूर्ण लूकमध्ये भगवान श्रीकृष्णांप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती स्पष्टपणे जाणवत होती. पारंपरिक गुजराती साज, आकर्षक दागिने आणि भक्तिमय वातावरण यांचा सुंदर मिलाफ अँटिलियातील जन्माष्टमी सोहळ्याला अधिकच खास बनवणारा ठरला. त्यामुळे या सोहळ्याची झलक सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अखेर मोठ यश, सरकारने घेतला मोठा निर्णय, घडामोडींना वेग
  • एक लाख नोकऱ्यांना कायमचे संपवणार ही कंपनी, इलेक्ट्रीक कारचा फटका ?
  • मोठी बातमी! रशियानं, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा, अमेरिकेचे..
  • आसिम मुनीर सर्वशक्तिमान! पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल, भारतावर काय परिणाम होणार?
  • सकाळी काही अडचणी आल्या मात्र…अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in