• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

July 8, 2026 by admin Leave a Comment


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीनंतर दोन आठवडे उलटूनही बियाण्यांना साधा अंकुरही फुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्यांची खरेदी केली होती. मात्र, बियाणे उगवले नसल्याने आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे बियाणे, मजुरी, खते आणि मशागतीचा दुहेरी खर्च सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

दरम्यान, निकृष्ट बियाण्यांचा हा मुद्दा राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची विक्री त्वरित बंद करण्यात यावी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय, ज्या कंपन्यांच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच ज्या शेतांमध्ये बियाणे उगवले नाहीत त्या शेतांचे तातडीने शासकीय पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासन आणि संबंधित बियाणे कंपन्यांकडून त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : समोसा खायची इच्छा झाली, लोको पायलटने थेट रेल्वेच थांबवली? त्या व्हिडीओची तुफान चर्चा!
  • चाकणकरांच्या मानहानीच्या दाव्यातील हवाच निघणार?; दीपाली सय्यद यांच्या नव्या दाव्याने खळबळ
  • IAF : जबरदस्त, अभिमानास्पद बाब, इंडियन एअर फोर्सची कमाल, जागतिक रँकिंगमध्ये चीनला टाकलं मागे, पाकिस्तान तर आसपास पण नाही
  • Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
  • सौरव गांगुलींच्या बायोपिक पोस्टरची तुफान चर्चा, तो सीन पुन्हा….दादा चित्रपटात नेमकं काय असणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in