• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akanksha Chamola : गौरव खन्नासोबत घटस्फोट घेणार आणि पुन्हा संसार थाटणार? आकांक्षा चामोलाने दुसऱ्या लग्नाबद्दल केले खळबळजनक विधान

July 8, 2026 by admin Leave a Comment


नेटफ्लिक्सचा रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ दररोज नवनवीन वादांना तोंड देत आहे. या सीझनमध्ये आकांक्षाने तिचा पती गौरव खन्नाला घटस्फोट देत असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. बिग बॉस 19 चा विजेता गौरवने शोमध्ये आपल्या पत्नीवरील आपले नितांत प्रेम वारंवार व्यक्त केले होते आणि शेवटच्या काही भागांमधील या जोडीची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती. आता लॉकअपच्या प्रीमियर एपिसोडमध्ये खळबळ माजवल्यानंतर, आकांक्षा चमोलाने आता एक नवीन खुलासा केला आहे. आकांक्षाने आता दुसऱ्या लग्नावर आपले मत मांडले आहे. आकांक्षाला दुसरे लग्न करायचे आहे की नाही याबाबत आता खुलासा झाला आहे.

पामेलासोबतच्या नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान आकांक्षा चमोला म्हणाली, “मी खूप लहान वयात, फक्त 24 व्या वर्षी लग्न केले.” त्यावर पामेला म्हणाली, “तू अजून खूप तरुण आहेस, तुला कोणीतरी भेटेल.” आकांक्षाने उत्तर दिले, “मला पुन्हा लग्न करायचे नाही. मला वाटतं माझं आता पुरे झालं. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच सिंगल राहणार आहे. म्हणजे, ना माझ्या आई-वडिलांच्या घरात, ना माझ्या नवऱ्याच्या घरात. मी माझं स्वतःचं घर विकत घेणार आहे. आता मी माझं आयुष्य एकटीने जगणार आहे.” बिग बॉस 19 च्या फॅमिली वीक दरम्यान आकांक्षाने याबद्दल भाष्य केले होते. ती म्हणाली की, “मला कधीही मुले नको होती आणि मुलाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी मी स्वतःला तयार समजत नव्हती. मला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते.”

आकांक्षा चमोलाने यापूर्वी ‘मी बायसेक्शुअल आहे” असं सांगून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. तिचे मुलींसोबतही संबंध होते. तिने पहिल्यांदा गौरव खन्नापासून घटस्फोटाची घोषणा करून आणि नंतर तिच्या बायसेक्शुअल आहे असं कबूल केले. गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी लग्नाच्या 10 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत, आकांक्षाने तिच्या पतीबद्दल काहीही नकारात्मक म्हटलेलं नाही. त्याच वेळी, शोच्या बाहेर, गौरव खन्ना पत्नीला पाठिंबा देताना दिसला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkari : इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवरुन संपूर्ण देशात वादविवाद सुरु असताना गडकरीचं ओपन चॅलेंज, ‘तुम्ही मला..’
  • पीरियड्स सुरू होते पण..; पुणे-मुंबई महामार्गावर 9 तास अडकलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था
  • IND vs ENG: We Want Sanju…चाहत्यांनी घेरताच गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, इंग्लंडविरुद्धच्या निराजशाजनक पराभवानंतर Video Viral
  • मोठी बातमी, राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, सरकारच्या मनात काय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच सांगितलं
  • 15 दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खाल्या, तरी अभिनेत्रीच्या हातून गेली ‘छैया छैया’ गाण्याची ऑफर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in