• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajinkya Rahane Video: कॅप नंबर 278… वास्तव हे आहे की… क्रिकेटमधून का घेतला संन्यास? कारण सांगताना अजिंक्य राहणे रडला

July 30, 2026 by admin Leave a Comment


भारतीय फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली. 38 वर्षीय रहाणे बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. त्याने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रहाणेने 2011 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. मागील दोन ते तीन वर्ष तो सातत्याने संघात पुनरागमनाच्या अपेक्षा लावून बसला होता पण अखेर तस काही घडलं नाही आणि त्याने निवृत्ती जाहीर केली. अजिंक्य रहाणेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, “कॅप 278 आता निरोप घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच कृतज्ञ राहीन. आयुष्याचे सत्य हे आहे की प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतो. जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा आपण फक्त तिचा आदर करून पुढे जायला हवे. मी माझ्या फलंदाजीमध्ये नेहमीच टायमिंगवर अवलंबून राहिलो आहे आणि त्याचे महत्त्व जाणतो. आज मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना रहाणे म्हणाला, “लहानपणी सरावासाठी डोंबिवलीला ये-जा करण्याच्या दिवसांपासून मी या खेळाला माझे सर्वस्व दिले आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक डावात आणि प्रत्येक फलंदाजीच्या संधीत माझे एकच स्वप्न होते: भारताची कॅप घालणे. मी नेहमी एका नियमाचे पालन केले: नेहमी माझ्या देशाला आणि माझ्या संघाला स्वतःपेक्षा वर ठेवायचे. मी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणे खेळलो आहे आणि माझा नेहमीच विश्वास आहे की जर तुमचे हेतू शुद्ध असतील, तर खेळ नेहमी तुमची काळजी घेतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

आपल्या प्रथम-श्रेणी क्रिकेट पदार्पणाची आठवण सांगताना अज्जू म्हणाला, “मी प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू म्हणून पदार्पण केल्यापासून भारतीय क्रिकेटने प्रचंड प्रगती केली आहे आणि गेल्या 20 वर्षांपासून त्याचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. एक भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा अध्याय संपत असला तरी, खेळासोबतचा माझा प्रवास अजून संपलेला नाही. मी पुढच्या पिढीला मदत करण्यास, या खेळातून शिकलेली मूल्ये त्यांच्यासोबत वाटून घेण्यास आणि ज्या खेळाने मला सर्व काही दिले आहे, त्या खेळाला काहीतरी परत देण्यास उत्सुक आहे मुंबईतील माझ्या बालपणापासून ते भारतासाठी खेळण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. या प्रवासात अनेक विजय आणि पराजय आले, पण क्रिकेट खेळण्याचा आनंद, वेगवेगळ्या संघांचा भाग असणे आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण निर्माण करणे, हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे समाधान आहे.”

“बीसीसीआय, एमसीए, माझे संघसहकारी, प्रशिक्षक, प्रत्येक आयपीएल फ्रँचायझी, राधिका, माझे संपूर्ण कुटुंब, मित्र आणि मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तसेच, प्रत्येक चढ-उतारात मला साथ देणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांचेही मनःपूर्वक आभार. अजिंक्य म्हणजे ‘अजिंक्य’, पण क्रिकेटने मला अनेकदा पराभवाची चव चाखायला दिली आहे. क्रिकेटपटू म्हणून, आपण यशस्वी होण्यापेक्षा जास्त वेळा अपयशी होतो. माझ्या संघाने सामने गमावले आहेत आणि माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण एक जागा अशी आहे जिथे मी कधीही हार मानली नाही: तुमची मने. तुम्ही मला नेहमीच तुमच्या कुटुंबातील एक सदस्य मानले आहे. तुमच्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. कॅप क्रमांक 278, मी आता निरोप घेतो.”

अजिंक्य रहाणेने 2007 मध्ये मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 205 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 42 शतकांसह 14,209 धावा केल्या. त्याने 192 लिस्ट ए सामन्यांमध्ये 6,853 धावा आणि 308 टी20 सामन्यांमध्ये  7,968 धावा केल्या. आयपीएलमध्ये, रहाणेने केकेआर, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्सआणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व केले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in