
Aishwarya Narkar: सोशल मीडियावरील कोणत्या ट्रेंडिग गाण्यावर ऐश्वर्या नारकर रिल बनवणार नाहीत, असं होणार नाही. आता देखील ऐश्वर्या नारकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या यांनी पती अविनाश नारकर यांच्यासोबत ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स करत सोशल मीडियावर रिल पोस्ट केली आहे. सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडियावर ‘जनाबाई आलीये ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताताथैया’ हे गाणं ट्रेंड करत असून त्यावर नारकर जोडप्याने ठेका धरला आहे. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आहे.
व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘Rakhi-ready Kisna, waiting for his sisters’ असं कॅप्शन दिलय. त्यांंचा हा भन्नाट डान्स अनेकांना आवडला आहे, तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आयुष्य कसं जगलं पाहिजे आणि जोडीदार कसा असला पाहिजे, हे ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर या जोप्याला पाहिल्यानंतर कळतं. पण त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही.
ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर यांचा व्हिडीओ….
View this post on Instagram
ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘दोघेही एक नंबर लय भारी…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ तुमचं वय नाही, तर तुमचा उत्साह आणि सकारात्मकता महत्त्वाची आहे. लोक काय बोलतात, कोण काय टीका करतं याचा जास्त विचार करू नका.’, तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘Great ऍक्टर नारकर couple’ असं म्हणत अनेकांनी दोघांचं कौतुक केलं आहे.
तर, ऐश्वर्या नारकर आणि आविनाश नारकर यांना अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे. ‘हे तुम्हाला शोभत नाही‘, अशी कमेंट एका नेटकऱ्यांने केली आहे. अन्य काही नेटकरी ट्रोल करत म्हणाले, ‘कुठं नवस केलं होतं काय माहित… दोघांचे 36 पैकी 36 जुळलेत.. तुमच्यापेक्षा गौतमी पाटील छान करते..’, ‘मी पुन्हा अजिबात पाहणार नाही यांचे reels ..’, सध्या दोघांचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे.
Leave a Reply