• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा

July 29, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन संपल्यानंतर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या घरी परतले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जंगी स्वागत करत पुष्पहार घालून जयघोष केला.

सुमारे 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “भारतात परत आल्यापासून मी आंदोलनातच होतो. मागील 36 दिवस आम्ही जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष केला. आमच्या लढ्याला यश मिळालं असून, हा विजय संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा आहे. इतक्या दिवसांनंतर आई-वडिलांना भेटण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांनी सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं. “20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई अत्यंत दुर्दैवी होती. आंदोलनानंतरही विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना घरी जाऊन धमकावलं जात आहे. विद्यार्थी दहशतवादी नाहीत, ते देशाचं भविष्य आहेत,” असं दीपके यांनी सांगितलं.

अभिजीत दीपके यांनी पुढे इशारा देत म्हटलं की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत विद्यार्थ्यांचा संघर्ष यशस्वी झाला. मात्र, सरकारने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि योग्य भूमिका घेतली नाही, तर हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलण्याची ताकद ठेवतात.”

दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची पुढील भूमिका काय असेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघटना पुढे कोणती दिशा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in