
सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा चर्चेत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आज अभिजीत छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचला आहे. सर्वांनी उत्साहात अभिजीत दीपकेचे स्वागत केले. दरम्यान, अभिजीतचे वडील भगवान दिपके यांनी केलेल्या वक्तव्याने विशेष लक्ष वेधले आहे.
भगवान दीपके यांनी आज मुलगा घरी येत असल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी अभिजीत अमेरिका सोडून आलाय लोकांना साधा जॉब लागला तरी कोणी सोडत नाही. आता माझे सर्वांनाच आवाहन आहे की अभिजीतच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी भीती व्यक्त करत, मुलगा म्हणून पहिले मला चिंता वाटायची. तो सुखरूप येतो की नाही याची मला भीती वाटायची. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण होतं. तो एक मिनिट आम्हाला कंटिन्यू कधीच बोलला नाही, जास्तीत जास्त 30 सेकंद खूप झालं.
अभिजीतच्या करिअरविषयी बोलताना वडील म्हणाले की, त्याला खूप चांगल्या ऑफर आल्या होत्या. त्याने स्वतःचे करिअर उध्वस्त केल्यासारखं आहे. तो सगळं सोडून आला आहे.
आज अभिजीत दीपके हा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर घरी परतला आहे. त्याच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. पण अभिजीतला स्वत:च्या घरी फारसे थांबत येणार नसल्याचे म्हटले आहे.




Leave a Reply