• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : …तर आता थेट सरकार बदलू, संभाजीनगरात येताच अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; सरकार पुन्हा टेन्शनमध्ये!

July 29, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिललीतील आंदोलन संपलेले आहे. या आंदोलनातील प्रमुख चेहरे आता आपापल्या घरी परतत आहेत. सीजेपीचे संस्थापक आणि हे आंदोलन उचलून धरणारे अभिजीत दीपके हेदेखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात पोहोचले आहेत. संभाजीनगरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ते विमानतळावर पोहोचताच त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी दीपके यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारला मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे. दीपके यांचे हे विधान म्हणजे भविष्यात सीजेपी आणखी मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

 आई-वडिलांना भेटतोय यााच आनंद

आज जवळपास 40 दिवसांच्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो याचा मला खूप आनंद आहे. मी भारतात आलो तेव्हापासून आंदोलनच चालू होते. मागच्या 36 दिवसांपासून आम्ही जंतर-मंतरवर बसलेलो होतो. आमच्या मेहनतीला यश आले आहे. देशातील सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. मी आई-वडिलांना भेटतोय याचा मला आनंद आहे, अशा भावना अभिजीत दीपके यांनी व्यक्त केल्या.

विष्यात हेच विद्यार्थी सरकार बदलतील

तसेच, त्यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. सरकारने स्वत:मध्ये सुधारणा करावी. 20 जुलै रोजी सरकारमुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर रक्त वाहिले. हे अतिशय वाईट होते. विद्यार्थ्यांचे एवढे रक्त वाहिलेले असताना सरकारचे मन भरलेले नाही. वेगवेगळ्या राज्यात विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. विद्यार्थ्यंना घरी जाऊन पोलीस त्रास देत आहेत, असा दावा त्यांनी केला. अटक करण्याची, ताब्यात करण्याची धमकी दिली जात आहे. विद्यार्थी हे दहशतवादी नाहीत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाच्या भवितव्याला जर असा त्रास द्यायचा असेल तर भविष्यात सरकारचे अवघड होईल. आज फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. हे सरकार योग्य पद्धतीने न वागल्यास भविष्यात हेच विद्यार्थी सरकार बदलतील, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, दीपके आता आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यामुळे ते आता भविष्यात काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in