• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke : कुठे आहे अभिजीत दीपके, अजून घरी नाही परतला, शिंदेंच्या मंत्र्याकडून दीपके कुटुंबासाठी पोलीस संरक्षणाची मागणी

July 27, 2026 by admin Leave a Comment


सध्या सगळीकडे अभिजीत दीपकेची चर्चा आहे. सगळ्यांनाच अभिजीत दीपकेबद्दल जाणून घेण्यात उत्सुक्ता आहे. कारण या देशातील विरोधी पक्षांना जे जमलं नाही, ते अभिजीत दीपकच्या कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. या आंदोलनात अभिजीत सोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत आपल्या मुद्यांवर ठाम राहिला. अखेर इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सुरु झालेल्या अभिजीत दीपकेच्या कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं. नीट पेपर फुटीच्या मनस्तापामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवून घेतलं. या सगळ्यासाठी धर्मेंद्र प्रधान जबाबदार असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी अभिजीत दीपकेच्या सीजेपीची मागणी होती. त्यात ते यशस्वी ठरले.

मागच्या 12 वर्षात देशातील एकाही विरोधी पक्षाला आंदोलनद्वारे मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घेणं शक्य झालं नव्हतं. ते काम अभिजीत दीपकेने करुन दाखवलं. आता अभिजीत दीपके कुठे आहे? हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. काल त्याचा एक फोटो समोर आलेला. त्यात अभिजीत उपचार घेताना दिसलेला. अभिजीत दीपकेला आंदोलनादरम्यान टायफॉईडची लागण झाली. अजूनही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. अभिजीत दीपकेचं घर छत्रपती संभाजीनगर वाळूंज एमआयडीसी परिसरात आहे. रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दीपकेच्या घरी जाऊन त्याच्या पालकांची भेट घेतली. “मला अभिजीतचा अभिमान आहे. माझ्या भागात राहणाऱ्या एका युवकाने क्रांतीची सुरुवात केली आहे. त्याला संरक्षण मिळालं पाहिजे” असं शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट काय बोलले?

अभिजीत दीपके अजून घरी परतलेला नाही. त्याच्यावर टायफॉइडचे उपचार सुरु आहेत. संजय शिरसाट यांनी दीपके कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “अभिजीतचे आई-वडिल चिंतेत होते. कुठल्याही आई-वडिलांना वाटतं की, आपल्या मुलाने सुरक्षित असावं. अभिजीत महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. या बद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे”

शिरसाट दीपके कुटुंबाला का भेटले?

अभिजीत दीपकेने हे आंदोलन मोदी सरकार विरोधातच केलं. मोदी सरकार विरोधातच जंतर-मंतरवर घोषणा दिल्या. संजय शिरसाट यांचा शिवसेना पक्ष महायुतीमध्ये भाजपसोबत एकत्र आहे. या भेटीवर स्पष्टीकरण देताना संजय शिरसाट म्हणाले की, “राजकीय दृष्टीकोनातून पहावं म्हणून मी दीपके कुटुंबाला भेटलो नाही. मी दीपके परिवाराला 25 वर्षापासून ओळखत आहे”



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in