• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले…

August 1, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी समर्थकांशी संवाद साधत असताना त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवला. त्यांचा बीपीही काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले.

सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास अभिजीत दिपके समर्थकांशी बोलत होते. त्यावेळी अचानक त्रास जाणवू लागल्याने ते घरात निघून गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, सकाळपासून त्यांना मळमळ आणि उलटीसारखे जाणवत होते. त्यांना दोन-तीन उलट्या झाल्या असून, लूज मोशनचाही त्रास झाला. बीपी थोडा लो होता. त्यामुळे त्यांना आयव्ही देण्यात आला असून, पाच-सहा वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरामानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तर रक्त तपासणी केली जाणार आहे. दिल्लीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टर पुन्हा टेस्ट करण्याचा विचार करत आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी असून त्यांच्यावर घरीच उपचार होत असल्याचे डॉक्टरांनी कळवले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in