• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही…

July 22, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राज्याचे मंत्री आशिष जैस्वाल यांनी या मागणीवर प्रतिक्रिया देत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचा दावा केला.

आशिष जैस्वाल म्हणाले की, NEET पेपरफुटीची घटना दुर्दैवी होती, मात्र हा प्रकार सरकारने घडवून आणलेला नव्हता. पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत फेरपरीक्षा घेतली, तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. त्यानंतर परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली असून, पात्र विद्यार्थी सध्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. तरुणांना योग्य दिशा दाखवण्याऐवजी सरकारविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी आंदोलन आणि राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचेही ते म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, संबंधित मंत्र्यांचा एखाद्या प्रकरणाशी थेट संबंध किंवा वैयक्तिक जबाबदारी सिद्ध झाल्यासच राजीनाम्याचा प्रश्न निर्माण होतो. “धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः पेपरफुटी केली आहे का किंवा त्यांच्यावर थेट वैयक्तिक आरोप आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असून, आंदोलनकर्त्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CNG Price: महिन्याच्या अखेरीस महागाईचा झटका! गेल्या 4 महिन्यात 10 रुपयांची वाढ, आज पुन्हा सीएनजी महागला, मुंबईसह राज्यात काय भाव?
  • Marathi Language Row : तुम्ही कोणाला चॅलेंज करताय, आमच्या अंगावर आलात तर कन्फर्म..अमित ठाकरेंची वॉर्निंग
  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in