• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

July 18, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान याच्यानंतर आता बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. आमिर खानला धमकी देण्यात आली आहे.आमिर खानला सोशल मीडियावर बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिरला धमकी देणारी व्यक्ती गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ ‘अर्जू बिश्नोई’ आहे आणि या धमकीची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. धमकीच्या या दाव्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.  लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी सोशल मीडियावर पोस्ट्स आणि ऑडिओ क्लिप्स शेअर करून आमिर खानला धमकावलं आहे. मात्र, धमकीच्या या वृत्ताबाहत अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.

दरम्यान या धमकीबाबत मुंबई पोलिसांकडे अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. तर पोलिसांकडून सोशल मीडियावरील दावे आणि व्हायरल ऑडिओची पडताळणी देखील सुरू आहे.

धमकीमागे ‘लव्ह जिहाद’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये या धमकीमागची कारणेही नमूद केली आहेत. यात अभिनेता आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आला असून, बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या त्या हँडलने त्याला लक्ष्य करण्याची घोषणा करण्यामागे हेच कारण असल्याचे म्हटलं आहे.

पोस्टमध्ये काय लिहीलंय ?

जय श्री राम
जय सीता राम

मी, आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य), असं जाहीर करतो की आमीर खानसारखे लोक आपल्या देशात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहेत, ही गोष्ट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही हे कृत्य खपवून घेणार नाही आणि त्याला लवकरच चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. हे कृत्य आपल्या सनातन धर्माच्या आणि राष्ट्राच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशवासियांना वचन देतो की, जो कोणी या घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन देईल, त्याला आमच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल. स्टारडमच्या नावाखाली जे लोक या गोष्टीला प्रोत्साहन देत आहेत, आम्ही त्यांचे श्वास रोखू, असं या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

आमिरकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

दरम्यान, ही व्हायरल पोस्ट आणि कथित ऑडिओबाबत आमीर खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचप्रमाणे, संबंधित तपास यंत्रणा किंवा पोलिसांनीही या दाव्याला दुजोरा दिलेला नाही किंवा त्याचे खंडनही केलेले नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, आमीर खानच्या तिसऱ्या लग्नाबाबत त्याच्या विरोधात फतवा देखील जारी करण्यात आला होता.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in