• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aaditya Thackeray | लाठ्या-बंदुका आणा… मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

July 24, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलन सुरू झाले असून, हजारो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “या मैदानावर आज जमलेली गर्दी एका पक्षाची नाही, तर देशासाठी एकत्र आलेल्या भारतीयांची आहे. आपली ओळख विसरायला भाग पाडणाऱ्यांना आणि भीती दाखवून राज्य करणाऱ्यांना हा जनतेचा आवाज ऐकावा लागेल.”

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जचा उल्लेख करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. “तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील; पण आमच्या हातात तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढण्याची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नाही. या, लाठ्या-बंदुका घेऊन या… मी तिरंगा घेऊन येतो. पाहूया, तिरंगा जिंकतो की हुकूमशाही,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

दरम्यान, दिल्लीतील NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू असून, मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनातील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in