• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

90 किलोमीटर वेगाने वादळ, 17 राज्यात हाहाकार! आयएमडीचा मोठा इशारा, 72 तास..

May 27, 2026 by admin Leave a Comment


देशासमोर अत्यंत मोठा धोका आहे. अनेक राज्यात उष्णता वाढली आहे. उकाड्याने लोक हैराण झालीत. भारतीय हवामान विभागाने यादरम्यान एक मोठा इशारा जारी केला. आयएमडीनुसार, 27 मे 2026 रोजी 17 राज्यांमध्ये जोरदार वादळे, मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट होऊ शकतो. तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान काही राज्यांमध्ये ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वादळी वारेही असेल. देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. त्यामध्येच आता हा मोठा इशारा वर्तवला आहे. तज्ज्ञांच्या मते, काही राज्यात उष्णता अजून वाढू शकते. पुढील 72 तास अत्यंत महत्वाची आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह भयंकर पाऊस झाला. 100 हून अधिक लोक या चक्रीवादळात ठार झाले. आजही होणाऱ्या पावसादरम्यान वादळाचा वेग खूप जास्त असेल.

विदर्भात उष्णतेचा कहर बघायला मिळत आहे. ब्रह्यपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज भारतीय हवामान विभागाने वर्धा, अमरावती आण चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा मोठा अलर्ट जारी करत रेड अलर्ट दिला. आजही या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर असेल. नागपूर, गडचिरोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका आता लहान मुलांच्या आरोग्यावर बसताना दिसत आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप, उलटी-जुलाब आणि न्यूमोनियासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

अकोला जिल्ह्यात नवतपाच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा कहर वाढताना दिसत आहे. काल अकोल्याचे तापमान 45.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते, तर आज तापमान 44.1 अंशांवर पोहोचले आहे. दुपारच्या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत असून गरम वाफा आणि उष्ण वारे नागरिकांना त्रस्त करत आहेत. वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवरही नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in