• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

80 वर्षांच्या वृद्धाने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला समुद्र, त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी, Video

August 31, 2026 by admin Leave a Comment


तुम्हाला एखाद्या ठिकाणाला भेट देण्याची खूप इच्छा असते, तळमळ असते. परंतु वय वर्ष 80 पर्यंत तो योग काय तुमच्या आयुष्यात येत नाही, आणि अचानक एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येतो की, तुम्ही शेवटी त्या ठिकाणाला भेट देतात. तेव्हा तुमच्या भावना काय असू शकतात? हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ओडिशाच्या कोणार्कमधील आहे. ज्यांनी-ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला ते लोक देखील चांगलेच भावुक झाले आहेत. एक मुलगा पहिल्यांदाच आपल्या 80 वर्षांच्या वडिलांना समुद्र दाखवण्यासाठी घेऊ गेला. आयुष्यात पहिल्यांदा समुद्र पाहीलेल्या या व्यक्तीच्या मानातील भावना या व्हिडीओमध्ये कैद झाल्या आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, एक मुलगा आपल्या 80 वर्षांच्या वृद्ध वडिलांना घेऊन, समुद्र दाखवण्यासाठी येतो. आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र पाहिलेल्या या वृद्धाच्या कृतीमुळे तिथे उपस्थित सर्व लोक भारावून जातात. हा व्हिडीओ ओडिशाच्या कोर्णाकमध्ये असलेल्या चंद्रभागा बीचचा असल्याचा दावा केला जात आहे. मुलगा आपल्या वडिलांना हळुहळु समुद्राजवळ घेऊन जात आहे, त्याच्या वडिलांनी यापूर्वी आधी कधीच समुद्र पाहिलेला नाही, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एकीकडे आश्चर्याचे भाव होते, तर दुसरीकडे ते भावुक देखील झाले होते. त्यानंतर त्यांनी समुद्राच्या लाटांचं पाणी आपल्या हातात घेतलं, आणि समुद्राला नमस्कार केला. या वृद्धाने ते पाणी आपल्या अंगाला देखील लावलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhukkhad Musafir | Shrikant Pandey (@bhukkhad_musafir)

आयुष्यात या व्यक्तीने पहिल्यांदा समुद्र पाहिला होता. पण त्यांच्यासाठी ते फक्त अंथाग पाणी नव्हत तर ती गोष्ट या वृद्ध व्यक्तीच्या अस्तेशी जोडलेली होती, धार्मिकतेशी जोडली गेली होती. या वृद्धाला नंतर विचारण्यात आलं की, तुम्ही समुद्राला नमस्कार का केला? तर त्याचं उत्तर ऐकून तेथील सर्व लोकांचे डोळे पाणावले तो म्हणाला की याच मार्गाने श्रीराम हे सीता मातेला आणण्यासाठी गेले होते, म्हणून नमस्कार केला.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच…
  • 1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल
  • पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
  • नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
  • Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in