• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

8 लेकरांची माय, जावयावर जडला जीव; नंतर केलं नको ते कांड, सासरा कोमात…

May 2, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 8 मुलांची आई जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे तो जावईही पाच मुलांचा पिता आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना एका कौटुंबिक लग्नसमारंभादरम्यान सुरू झाली. आरोपी जावई आपल्या सासरी आला होता. दुपारच्या सुमारास त्याने मेहंदीची पाने तोडण्याच्या बहाण्याने सासूला घरामागील शेतात बोलावलं. बराच वेळ दोघे न परतल्याने कुटुंबातील लोक त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी कुटुंबीयांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं, ज्यामुळे घरात गोंधळ उडाला. पकडले जाण्याच्या भीतीने आणि गोंधळ वाढल्याने जावई आपल्या सासूला मोटारसायकलवर बसवून तेथून पळून गेला.

12 वर्षांपूर्वीपासून सुरू होती प्रेमकथा

ही सासू-जावयाची जोडी गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची लग्नं दोन सख्ख्या बहिणींशी झाली होती. लग्नानंतर तीन वर्षांनी मोठ्या जावयाचे आणि त्याच्या सासूची जवळीक वाढली. त्यावेळी 12 वर्षांपूर्वी ते एकदा घर सोडून पळून गेले होते. दोघांचा शोध घेतल्यानंतर दिल्लीतील एका कंपनीतून पकडून परत आणण्यात आलं होतं. कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी दोघांवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा दोघेजण पळून गेले आहेत.

कुटुंबाची बदनामी

आग्रा येथील या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. पीडित पती, जो आठ मुलांचा पिता आहे, त्याला आपल्या पत्नी आणि जावयाच्या या कृत्यामुळे मोठा धक्का बसला आहे. तर पाच मुलांची आई असलेल्या आरोपीच्या पत्नीचीही अवस्था वाईट आहे. गावात या अनैतिक संबंधाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दोन्ही कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे.

पोलीसांकडून तपासाला सुरुवात

या घटनेनंतर महिलेच्या पतीने या प्रकरणात फरह पोलीस ठाण्यात आपल्या जावयाविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. त्याने जावयावर आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत असून दोघांचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी…
  • IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
  • Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून
  • मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  • रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in