• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

64, 95, 65, 57 आणि 59..! पप्पू यादव यांच्या मुलाची वादळी खेळी, तरीही संघाला पाहावं लागलं पराभवाचं तोंड

August 14, 2026 by admin Leave a Comment

Delhi Premier League 2026: दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्सचा कर्णधार सार्थक रंजन याची वादळी खेळी सुरूच आहे. सलग पाच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं आहे. त्याच्या या खेळीचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. तसेच त्याला पुढच्या स्पर्धांसाठी दारं खुली होणार आहेत. पाचव्या सामन्यात नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स आणि पुरानी दिल्ली 6 हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सार्थ रंजनी बॅट तळपली, पण या सामन्यात काही विजय मिळवता आला नाही. पुरानी दिल्ली 6 संघाविरुद्ध अतितटीच्या सामन्यात नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्सचा 4 विकेट्सने पराभव झाला. शेवटच्या षटकात पुरानी दिल्ली 6 ला 7 धावांची गरज होती. त्यामुळे हा सामना रोमहर्षक ठरला. पंकज जयस्वालच्या खेळीमुळे सार्थक रंजनची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. या सामन्यात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात..

नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स विरुद्ध पुरानी दिल्ली 6

डीपीएल 2026 स्पर्धेत पुरानी दिल्ली 6 ने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नॉ़र्थ दिल्ली स्ट्राइकर्स संघाचा कर्णधार सार्थक रंजन याने या सामन्यात आश्वासक सुरूवात करून दिली. ओपनिंगला आलेल्या सार्थक रंजनने 37 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारत 59 धावा केल्या. तर यश भाटिया यानेही 41 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यश दबास याने 36 धावा केल्या. या तिघांच्या खेळीमुळे नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्सने 186 धावांची खेळी केली आणि विजयासाठी 187 धावा दिल्या.

विजयी धावांचा पाठलाग करताना पुरानी दिल्ली 6 ने 19 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या. तसेच शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. विकास दीक्षित गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अश्विनी चिल्लरची विकेट काढली. त्यानंतर पंकज जसवाल स्ट्राईकला आला आणि त्याने सलग दोन षटकार ठोकले आणि सामना संपवला. पुरानी दिल्ली 6 ची सुरूवात काही चांगली झाली नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. पण मधल्या फळीत ललित यादव आणि अश्विनी चिल्लर यांनी डाव सावरला. ललित यादवने 64 धावा, तर अश्विनी चिल्लरने 45 धावांची खेळी केली.

सार्थक रंजन जबरदस्त फॉर्मात

सार्थक रंजन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आहे. इतकंच काय तर दुसऱ्या सामन्यात त्याचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. सेंद्रल दिल्ली किंग्सविरुद्ध 34 धावा, ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्ध 95 धावा, नवी दिल्ली टायगर्सविरुद्ध 65 धावा, वेस्ट दिल्ली लायन्स विरुद्ध 57 धावा आणि पुरानी दिल्ली 6 विरुद्ध 59 धावांची खेळी केली. त्याने पाच सामन्यात 170.85 च्या स्ट्राईक रेटने आणि 68 च्या सरासरीने 340 धावा केल्या आहेत. यात 32 चौकार आणि 21 षटकार मारले आहेत. त्याच्या नेतृत्वात नॉर्थ स्ट्राइकर्स दिल्लीने तीन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in