• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

55 कोटींचं ॲनालॉग पनीर नष्ट, 33 परवाने रद्द, 11 एफआयआर रद्द; तुकाराम मुंढे हात धुवूनच मागे लागले

August 5, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात कारवाई करत आहेत. FDA ने महाराष्ट्रात ॲनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतर आज तुकाराम मुंढे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आता पर्यंत 55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट करण्यात आले असून अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आर्टिफिशियल पनीरवर बंदी

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात ॲनालॉग पनीर म्हणजे नॉन डेरी पनीर विकल जात होतं. त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात 30 जुलै रोजी अधिसूचना काढून उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली आहे.

दंडात्मक कारवाई होणार

पुढे बोलताना मुंढे यांनी सांगितले की, आम्ही 308 ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते, त्यातील 35 टक्के नमुने घातक होते. आता आगामी काळात विशेष मोहिम राबवणार आहोत, जिथे गोदामं आहेत तिथे तपासणी होणार आहे. आता आगामी काळा आस्थापनांनी दुधाच्याच पनीरचा वापर करावा, कुणी बनावट पनीर विकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार आहोत.

28 लाख किलो साठा जप्त

तुकाराम मुंढे यांनी पुढे बोलताना सांगितले की, अन्न पदार्थांसंदर्भात 25 मे ते 31 जुलै पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली. 3 हजार 136 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, तसेच 774 आस्थापन्ना नोटीसा पाठवण्यात आली आहे. तसेच 165 आस्थापनाचे परवाने रद्द करण्यात आले. या कतारवाईत 28 लाख 66 हजर 96 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 55 कोटी रुपये होती. तसेच राज्यातील 890 फूड आऊट लेट्सची तपासणी करण्यात आली.

पनीर हा दुधाचा पदार्थ आहे पण ॲनालॉग पनीरमध्ये नॉन दुग्धजन्य पदार्थ आढळले आहेत, त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. अशा पनीरची छुप्या पद्धतीने विकली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सगळे आदेश उत्पादक प्रक्रिया करणारे, वाहतुकदार , वितरक, विक्रेते यांच्यासाठी बंधनकारक असणार आहेत. आता हॉटेल देखील ॲनालॉग पनीर वापरू शकत नाही, कारण या पनीरमध्ये प्रोटीन पेक्षा वनस्पती चरबी आढळली आहे. जी शिक्षा गुटखाबंदी संदर्भात आहे, तीच शिक्षा ॲनालॉग पनीर विकणाऱ्यांना दिली जाणार आहे.

FDA ची मोठी कारवाई

  • आता पर्यंत नष्ट केलेला माल – 28 लाख 66 हजार 096 किलो
  • नष्ट केलेल्या मालाची किंमत – 55.72 कोटी
  • 890 हॉटेलची तपासणी
  • 329 हॉटेलला सुधारणा नोटीस बजावल्या
  • 116 परवाने निलंबित
  • 11 एफआयआर दाखल करण्यात आले



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in