
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असताना, ५३० कोटी रुपयांच्या कामाचे बोगस टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तनय महाजन या आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. आरोपी तनय महाजन हा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याचे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी तीव्र टीका करण्यास सुरुवात केली आहे.
आरोपी तनय महाजन याने स्वतःला कुंभमेळा कामाचे टेंडर वाटप करणारा अधिकारी भासवून अनेक लोकांना फसवले. त्याने महाराष्ट्र सरकारच्या नावावर ५३० कोटी रुपयांची खोटी कागदपत्रे तयार केली आणि त्यावर आयुक्त प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी करून सुमारे ३ कोटी रुपये उकळले, अशी माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तनय महाजनसह आणखी एकाला अटक केली आहे. या घोटाळ्यामागे एक मोठे रॅकेट असण्याची आणि अजून काही मोठे चेहरे यात सामील असण्याची शक्यता असल्याने, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Leave a Reply