• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज

July 22, 2026 by admin Leave a Comment


नव्या पिढीलाही जुन्या सदाबहार गीतांची मोहिनी – आज केवळ वयस्कर लोकं किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणाईही जुन्या हिंदी गाण्यांच्या प्रेमात पडली आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे या गीतांना नवसंजीवनी मिळाली. एखादं जुनं भावगीत कानावर पडताच मन नकळत भूतकाळात रमून जातं. साधी पण हृदयस्पर्शी चाल, अर्थपूर्ण शब्द आणि सुरेल गायकी ही या गीतांची खरी ताकद आहे. त्यामुळेच दशकानुदशके उलटून गेल्यानंतरही त्यांची मोहिनी आजही कायम आहे.आज आपण अशाच एका अजरामर गीताविषयी जाणून घेणार आहोत. तब्बल 49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं आजही लाखो रसिकांच्या ओठांवर रेंगाळतं. त्याची धून कानावर पडताच, आपोाप ते गुणगुणायला लागतो. ( All Photos : Social Media)

49 वर्षांनंतरही तेवढंच लोकप्रिय – 1977 मध्ये प्रदर्शित झालेलं 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड गाजलं. सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठा यांनी हे गीत गायले होते. विशेष म्हणजे, या गाण्याचं रेकॉर्डिंग होत असताना सुषमा अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. पुढे हीच गायिका पूर्णिमा या नावाने लोकप्रिय झाली. 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटातील हे गाणं ऋषी कपूर, तारिक खान आणि काजल किरण यांच्यावर शूट करण्यात आलं होतं, जे प्रचंड गाजलं. आजही या गीताचं स्थान अढळ आहे.

मनाला मोहिनी घालणाऱ्या या भावस्पर्शी गाण्याचं संगीत होतं ते दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन याचं. तर मनाला भावणारे या गाण्याचे बोले लिहीले होते, विख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी. प्रेमभंग, मोडलेली आश्वासनं आणि विरहाचं दुःख या गाण्यात इतक्या प्रभावीपणे व्यक्त झालं आहे की, आजही ते ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळतं. या गाण्यात अभिनेता तारिक खान प्रभावीपणे, त्याच्या मनातील वेदना ऋषी कपूर आणि काजल किरण यांच्यासमोर व्यक्त करतो. आजही हे गाण श्रोत्यांच्या मनाला तितक्याच तीव्रतेने भिडतं.

सुमारे पाच दशकांनंतरही, म्हणजेच तब्बल 50 वर्षांनीही 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यूट्यूबवरील सारेगामाच्या अधिकृत लिरिकल व्हिडिओला 5.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या गाण्याच्या विविध कव्हर व्हर्जन्स आणि नव्या सादरीकरणांनाही लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांनी पसंती दिली. आजची तरुण पिढीही हे गीत तितक्याच आवडीने ऐकत असते. सोशल मीडियावर सातत्याने ट्रेंड होणारे रील्स आणि व्हिडिओ यातून गाण्याची आजही कायम असलेली लोकप्रियता सहज दिसून येते.

या गाण्याप्रमाणेच 'हम किसी से कम नहीं' हा चित्रपटही प्रचंड गाजला. नासिर हुसेन यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर, काजल किरण, झीनत अमान आणि अमजद खान यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 1 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेलाहा चित्रपट खूप यशस्वी झाला आणि बॉक्स ऑफीसवरही दमदार कमाई केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उरलीसुरली माणुसकी मेली… नेपाळमध्ये मृतदेहांच्या दागिण्यांची लूट; कोण आहेत दोन गिधाडे?
  • अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
  • अरे काय रे शिंदे गट? सोड रे, अरे चोरच आहेत ना? मुंबईचं महापौरपद किती कोटीला? राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
  • सर्वात मोठी बातमी ! नेपाळनंतर आता चीन हादरलं, भूकंपाने जमीनच डगमगली; नागरिकांमध्ये धावपळ
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून… नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यावर तो गंभीर आरोप, म्हणाले राहुल गांधी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in