• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

370 रुपयांची बिर्याणी वादादरम्यान व्हायरल झाला नवीन व्हिडिओ, वैभव सूर्यवंशीविषयी प्रणीत मोरे म्हणाला काय?

June 11, 2026 by admin Leave a Comment


Comedian Praneet More on Vaibhav Suryavanshi: स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे हा 370 रुपयांची बिर्याणीवरून ट्रोल झाला आहे. त्याची क्लिप व्हायरल होताच त्यावर मोठा वाद उफाळला आहे. त्यातच आता त्याची अजून एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याविषयी बरंच काही बोलून गेला. विशेष म्हणजे प्रणीत मोरे याच्या कार्यक्रमात सूर्यवंशी सुद्धा उपस्थित होता. त्याने विनोदी शैलीत वैभव आणि क्रिकेटमधील काही अफलातून किस्से सांगितले. त्याचवेळी पाकिस्तान खेळाडूंवर फिरकी टाकली आणि त्यांची विकेट घेतली. यावेळी वैभव सूर्यवंशीला सुद्धा हसू आवरता आलं नाही. हा जुना व्हिडिओ आहे. पण तो आता व्हायरल झाला आहे.

वैभव सूर्यवशी याचा सवाल

प्रणीत मोरे याच्या या जुन्या व्हिडिओत क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सुद्धा हजर असल्याचे दिसते. मंचावर प्रणीत मोरे याने सांगितले की तो वैभव सूर्यवंशी याला सोशल मीडियावर फॉलो करतो. तर विश्वचषकाच्या अंतिम सामान्यापूर्वी त्याने या खास शोमध्ये येण्यासाठी विचारणा केली होती. त्यानंतर प्रणीत मोरे याने खणखणीत चौकार लगावला. वैभव सूर्यवंशी तर पाकिस्तानी खेळाडूंचा क्लास घेतो. पण इथं येऊन माझा क्लास घेऊ नकोस, असे प्रणीत म्हणाला. त्यावर प्रेक्षकांनी खळखळून प्रतिसाद दिला. वैभव सुद्धा त्यावर हसला. या व्हिडिओत दोघांमधील हलका फुलका संवादही भाव खाऊन गेला.

इंग्लंडच्या गोलंदाजांवर तिरकस बाण

शो दरम्यान प्रणीत मोरे याने वैभव सूर्यवंशीच्या 19 वर्षांखालील दमदार फलंदाजीचे कौतुक केले. वैभव याने या टुर्नामेंटमध्ये केवळ 80 चेंडूत 175 धावा केल्या. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. एक बिहारी सर्वांवर भारी, असा यॉर्कर टाकताच प्रेक्षकांतून एकच हास्यकल्लोळ उठला. प्रेक्षकांनी प्रणीत मोरे याचे वाक्य उचलून धरले. क्रिकेट आणि कॉमेडीचा सूरही जुळतो हे या शोवरून समोर आले.

The way Vaibhav Suryavanshi said to Pranit More, “Bhaiya, main aapke show mein aa jaun, par aap meri class mat lena,” before appearing on his show. 👀

The good thing is that an RR manager was with him the whole time. That’s good for Suryavanshi. pic.twitter.com/4bpkEwIfM5

— Sonu (@Cricket_live247) June 11, 2026

कॉम्प्लानच्या जाहिरातीवर यॉर्कर

वैभव सूर्यवंशी याने काही दिवसांपूर्वी कॉम्प्लानची जाहिरात केली होती. त्यावर प्रणीत मोरे यांनी यॉर्कर टाकला. आता तरुण खेळाडूंना जोरदार फटकेबाजीसाठी कॉम्प्लान घेणे आवश्यक आहे. त्यानंतर बाबर आझमची आठवण काढत कॉम्प्लानमुळे त्याची उंची तर वाढली पण स्ट्राईक रेट वाढला नाही, असा चिमटा मोरेने घेतला. त्यावर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in